शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मेरिटाईम बोर्डाकडून पर्यटन व्यावसायिक वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:18 IST

तारकर्ली येथे वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे येथील छोट्या मोठ्या मच्छिमारांनी पर्यटनासाठी बोटींग व्यवसाय सुरु केला आहे. या बोटिंग व्यावसायिकांना नियमावलीच्या नावाखाली मेरीटाईम बोर्डाकडून वेठीस धरण्याचा प्रकार सुरु आहे.

ठळक मुद्देमेरिटाईम बोर्डाकडून पर्यटन व्यावसायिक वेठीसनियमावली जाचक : नारायण राणे यांचे वेधले लक्ष

सिंधुदुर्ग : तारकर्ली येथे वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे येथील छोट्या मोठ्या मच्छिमारांनी पर्यटनासाठी बोटींग व्यवसाय सुरु केला आहे. या बोटिंग व्यावसायिकांना नियमावलीच्या नावाखाली मेरीटाईम बोर्डाकडून वेठीस धरण्याचा प्रकार सुरु आहे.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी सुरज नाईक यांनी काढलेल्या जाचक अटींच्या फतव्यांमुळे तारकर्ली येथील बोटिंग व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. याकडे तारकर्लीतील बोटिंग व्यावसायिकांनी स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधले.यावेळी खासदार राणे यांनी बोटिंग व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर सुरज नाईक यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत मच्छीमारांशी सलोख्याने वागण्याच्या सूचना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना केल्या.मालवण येथे तारकर्ली येथील बोटिंग पर्यटन व्यावसायिकांनी तारकर्लीचे माजी सरपंच जितेंद्र केरकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार राणे यांची भेट घेतली. यावेळी राजेश केरकर, चेतन टिकम, प्रदीप केळुसकर, राजेश खराडे, सुरेंद्र केळुसकर, सुनील केरकर, लक्ष्मण कुबल, विष्णू देऊलकर, अर्जुन भोवर, सतीश टिकम यांसह अन्य उपस्थित होते.मच्छिमारांसाठी काम करास्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या तक्रारी जाणून घेतल्यानंतर खासदार राणे यांनी मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी सुरज नाईक यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड हे येथील स्थानिक मच्छिमारांसाठी असलेले खाते असून या खात्याचा कारभार मच्छिमारांच्या हितासाठी व्हावा, अशा सूचना खासदार राणे यांनी केल्या.

येथील छोट्या मोठ्या मच्छिमारांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी बोटिंग व्यवसाय सुरु केला असून येथील स्थानिक मच्छिमार बोटिंग व्यावसायिकांच्या अडचणींकडे तातडीने लक्ष घाला, असेही राणे म्हणाले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार