शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : तारामुंबरी नस्त भाग नौकांकरिता धोकादायक, मच्छिमार बांधवांची मागणी : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:19 IST

तारामुंबरी येथील समुद्रातील नस्त भाग हा मच्छिमारी नौकांकरिता धोकादायक झाला असून तारामुंबरी नस्त बंदरातील खडके व गाळ काढण्यात येऊन हा मार्ग सुरक्षित करण्यात यावा, अशी मागणी तारामुंबरी येथील मच्छिमार बांधवांनी आमदार नीतेश राणे व मत्स्य व्यवसाय खात्याचे अधिकारी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देतारामुंबरी नस्त भाग नौकांकरिता धोकादायक, मच्छिमार बांधवांची मागणी : नीतेश राणेमत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

देवगड : तारामुंबरी येथील समुद्रातील नस्त भाग हा मच्छिमारी नौकांकरिता धोकादायक झाला असून तारामुंबरी नस्त बंदरातील खडके व गाळ काढण्यात येऊन हा मार्ग सुरक्षित करण्यात यावा, अशी मागणी तारामुंबरी येथील मच्छिमार बांधवांनी आमदार नीतेश राणे व मत्स्य व्यवसाय खात्याचे अधिकारी यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात आमदार नीतेश राणे यांनी खास बैठकीचे आयोजन तारामुंबरी येथे केले होते. यावेळी मत्स्य व्यवसाय खात्याचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आर. आर. महाडीक, मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, ताम्हणकर, तारामुंबरी मच्छिमार संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

या चर्चेत प्रामुख्याने तारामुंबरी नस्त हा भाग मच्छिमारी नौकांना धोकादायक झाला असून यापूर्वीही छोट्या मोठ्या मच्छिमारी नौकांना या भागात अपघात झाले आहेत. त्यामुळे मच्छिमारांचे अतोनात नुकसान होत असून या भागातील खडके व गाळ उपसण्यात यावा व या बंदराचा योग्य तो आराखडा बनविण्यात येऊन तारामुंबरी नस्त भाग सुरक्षित करण्यात यावा अशी मागणी उपस्थितांनी केली.या अनुषंगाने संबंधित खात्याच्या अधिकाºयांकडे आवश्यक तो आराखडा स्थानिक मच्छिमारांनी मांडून त्या संदर्भात पुढील योग्य ती कार्यवाही करावी याकरिता आवश्यक त्या निधीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी दिले.तसेच परप्रांतीय हायस्पीड नौकांच्या घुसखोरीबाबत ठोस कारवाई मत्स्य व्यवसाय खात्यामार्फ त करण्यात यावी अशी आग्रही भूमिका त्यांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांसमोर मांडली. त्यावेळी अपुरा कर्मचारी वर्ग, अपुरी साधनसामुग्री यामुळे ठोस कारवाई करणे शक्य होत नाही. तरीही आतापर्यंत ३५ हून अधिक नौकांवर कारवाई केल्याच सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी नमूद केले.यासंदर्भात मत्स्य व्यवसाय खात्यामार्फत आगामी काळात परप्रांतीय हायस्पीड नौकांवर कारवाई करणे अशक्य होत असेल तर तसा अहवाल पोलीस प्रशासनाकडे द्यावा.

जेणेकरून या परप्रांतीय नौकांवर कारवाईसाठी स्थानिक आक्रमक झाल्यास त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनामार्फत होणार नाही याची खबरदारी मत्स्य व्यवसाय खात्याने घ्यावी, असेही आमदार राणे यांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग