शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू व्हावा - मंत्री दीपक केसरकर 

By अनंत खं.जाधव | Updated: August 12, 2023 17:58 IST

कोट्यवधी खर्च करून आंबोली येथे वर्षा पर्यटनाचे नियोजन केले खरे पण स्थानिकांची याकडे पाठ फिरवली

आंबोली : सिंधुदुर्ग सोन्याची खाण असून पर्यटनात नैसर्गिक विविधता आहे. त्यामुळे आंबोलीच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयाच आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरावा म्हणून शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी स्थानिकांचे सहकार्य अपेक्षित आहे असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. आंबोली येथे महाराष्ट्र पर्यटन विभाग व आंबोली ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षा पर्यटन महोत्सवात ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, उपवनसंरक्षक एस.एन रेड्डी, पर्यटनचे सचिन गोसावी, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार श्रीधर पाटील, माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, बाबा मोडकर, सरपंच सावित्री पालयेकर, शशीकांत गावडे  उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, आंबोलीसह सावडाव, नापणे  धबधब्यांवर बारमाही पर्यटन राहावे यासाठी पुढील काळात नियोजन करण्यात येणार आहे. आंबोली जगाच्या नकाशावर आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी एडव्हेंचर स्पोर्टला महत्व देण्यात आले आहे. जंगल सफारी पॅराग्लाइडिंग पेराशूटिंग अशा विविध प्रकारच्या माध्यमातून या ठिकाणी देशासह विदेशी पर्यटक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही केसरकर यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी पर्यटन महोत्सव झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरू केले त्यात बऱ्यापैकी यश येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आंबोली येथील पर्यटन महोत्सव असल्याचे त्यांनी सागितले. माजी आमदार राजन तेली यांनी आंबोली प्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर भागात ही पर्यटक वाढले पाहिजेत असे मत व्यक्त केले. कोट्यवधीचा खर्च पण स्थानिकांची पाठपर्यटन विभागाने कोट्यवधी रूपयांचा खर्च करून आंबोली येथे वर्षा पर्यटनाचे नियोजन केले खरे पण स्थानिकांची मात्र याकडे पूर्णपणे पाठ फिरवली. स्थानिक स्टॉल धारक ही मिळाले नाहीत. यामुळे बाहेरून काही स्टॉल आणावे लागल्याचे आंबोली ग्रामस्थांकडून स्पष्ट करण्यात आले. आम्हाला कालपर्यत काहीच माहीत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनtourismपर्यटनDeepak Kesarkarदीपक केसरकर