शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

सिंधुदुर्ग : सावंतवाडी पालिका सभेत नाणारविरोधी ठराव बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 15:17 IST

सावंतवाडी नगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी नाणार प्रकल्पाविरोधी ठराव घेण्याचा आग्रह केला. मात्र, नगराध्यक्षांनी तो टोलवून लावला.

ठळक मुद्देसावंतवाडी पालिका सभेत नाणारविरोधी ठराव बारगळलाजयेंद्र परुळेकर आक्रमक, शिवसेना नगरसेवकांचे मौन

सिंधुदुर्ग : सावंतवाडी नगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला केलेल्या विरोधावरून पालिका सभेत मतमतांतरे पहायला मिळाली. परुळेकर यांनी नाणार प्रकल्पाविरोधी ठराव घेण्याचा आग्रह केला. मात्र, नगराध्यक्षांनी तो टोलवून लावला. बैठकीत शिवसेना नगरसेवक मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे दिसून आले. त्यामुळे पुढील बैठकीत नाणारवर चर्चा घडवून आणावी, असा आग्रह परुळेकर यांनी धरला आहे.सावंतवाडी नगरपालिकेची मासिक सभा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी संतोष जिरगे, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक राजू बेग, बाबू कुडतरकर, मनोज नाईक, सुरेंद्र बांदेकर, आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, नगरसेविका शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, भारती मोरे, अनारोजीन लोबो, दीपाली भालेकर, समृध्दी विर्नोडकर आदी उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीला राजमाता सत्त्वशिलादेवी भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विविध विषयांचे वाचन करण्यात आले. त्यात यापुढे राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार कोणतीही निविदा ही मासिक बैठकीत न येता स्थायी समितीतच मंजूर करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. हा निर्णय वाचून दाखविण्यात आला. तसेच विविध विकासकामांनाही मंजुरी देण्यात आली. तसेच सेव्हन स्टार रॉकिंगमध्ये चांगले काम करून सावंतवाडी नगरपालिका स्वच्छतेत अग्रक्रमावर आणण्याचे यावेळी ठरविण्यात आले. मात्र, नाणारवर चर्चा सुरू असताना शिवसेना सदस्य मात्र गप्प होते. आपणास नाणारवर काहीच कळत नाही असेच ते अप्रत्यक्षपणे सांगत होते.विरोध करण्यापूर्वी बाजू ऐकून घेणे आवश्यकआयत्या वेळच्या विषयावेळी परुळेकर यांनी नाणार प्रकल्प हा प्रदूषणकारी आहे. यामुळे सिंधुदुर्गचा एक तालुका बाधित होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाविरोधी ठराव घ्या, अशी मागणी केली. मात्र याला नगरसेवक आनंद नेवगी यांनी अद्याप प्रकल्प झाला नाही. तसेच यावर अभ्यास सुरू आहे, असे सांगितले. तर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी एखाद्याला विरोध करण्यापूर्वी त्याची बाजूही ऐकून घ्यावीच लागेल, असे सांगत नाणारविरोधी ठराव टोलवून लावला.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्ग