शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : सावंतवाडी शहरावर पाणी कपातीचे संकट नाही : बबन साळगावकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 16:55 IST

सावंतवाडी पालिकेच्या पाळणेकोंड धरण व केसरी नळपाणी योजनेतून शहराला जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून शहरावर पाणी कपातीचे एवढ्यात कोणतेही संकट नसल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

ठळक मुद्देसावंतवाडीवर पाणी कपातीचे संकट नाही : बबन साळगावकर पाळणेकोंड धरण, केसरी नळपाणी योजनेत तूर्तास पुरेसा पाणीसाठा

सावंतवाडी : पालिकेच्या पाळणेकोंड धरण व केसरी नळपाणी योजनेतून शहराला जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून शहरावर पाणी कपातीचे एवढ्यात कोणतेही संकट नसल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.दरम्यान, पालिकेने अग्निशामक बंबाच्या बाबतीत घेतलेल्या धाडसी निर्णयातून आम्ही सुखरूप बाहेर पडलो असून पुन्हा एकदा बंब नागरिकांच्या सेवेत हजर झाला आहे. शिवाय पालिकेच्या अग्निशमन केंद्र्राचा मार्ग मोकळा झाला आहे.

येत्या आठवडाभरात त्याचे टेंडर काढण्यात येणार असल्याचे साळगावकर म्हणाले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे, नगरसेवक आनंद नेवगी, सुरेंद्र्र बांदेकर, अनारोजीन लोबो, माधुरी वाडकर, शुभांगी सुकी आदी उपस्थित होते.यावेळी साळगावकर म्हणाले, सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणावर गोडबोले गेट बसविण्यात आल्यानंतर दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी एक मीटरचा पाणी साठा जास्तीचा शिल्लक राहिला आहे. तसेच दुसरीकडे केसरी येथील नळपाणी योजनेवरील पाण्याची पातळी स्थिर आहे. त्यामुळे काही झाले तरी शहरातील नागरिकांना जुलै अखेरपर्यंत पाणी मुबलक प्रमाणात मिळणार आहे.

काही ठिकाणी उंचवठ्यावर असलेल्या घरांमध्ये पाणी पोहोचत नाही. मात्र इतर भागात दिवसांतून दोनवेळा पाणी देण्याबरोबर शहरानजीकच्या चराठे, माजगाव, कोलगाव आदी ग्रामपंचायतींनाही पालिका पाणीपुरवठा करते. साळगावकर पुढे म्हणाले, सावंतवाडी अग्निशमन केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी पालिकेच्या बाजूला आरक्षित असलेली जागा आमच्या ताब्यात आली आहे.

आता नव्याने त्या ठिकाणी केंद्र्र तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी ५२ लाख रुपये आमच्याकडे निधी प्राप्त झाला आहे. तर अन्य लागणारा निधी शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी आणखी एक बंब आणला जाणार आहे. येत्या आठवडाभरात त्यासाठी आवश्यक असलेली टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.गुजरात-गोध्रातून आणणार पांढरी वाळूशहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा. पालिकेच्या शुद्धिकरण प्रकल्पात गुजरात येथील गोध्रा जिल्ह्यातील पांढऱ्या दगडाची वाळू आणण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच आम्ही त्याठिकाणी भेट देणार असून तेथील जिल्हाधिकारी यांच्यामार्फत टेंडरव्दारे ही वाळू सावंतवाडीत आणण्यात येणार आहे, असे बबन साळगावकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMuncipal Corporationनगर पालिका