शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गवासीय सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:17 PM

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : सर्वत्र धुमधडाक्यात साजरा होणारा गणेश चतुर्थीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असून, जिल्ह्यात मंगलमय असे वातावरण निर्माण झाले आहे. सिंधुुुदुर्गात उद्या, शुक्रवारी ६७ हजार ७४८ घरगुती गणपती, तर ३५ सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सव हा उत्साहात व आनंदात साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गवासीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : सर्वत्र धुमधडाक्यात साजरा होणारा गणेश चतुर्थीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असून, जिल्ह्यात मंगलमय असे वातावरण निर्माण झाले आहे. सिंधुुुदुर्गात उद्या, शुक्रवारी ६७ हजार ७४८ घरगुती गणपती, तर ३५ सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सव हा उत्साहात व आनंदात साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गवासीय सज्ज झाले आहेत.दरम्यान, गेले दोन दिवस मुंबईकर (चाकरमानी) रेल्वे, एस. टी. महामंडळाच्या जादा गाड्या, लक्झरी बसेस आणि खासगी वाहनांमधून दाखल होत आहेत. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.कोकणपट्ट्यात या सणाला मोठी धामधूम असते. प्रत्येकाच्या घरी श्रींची मूर्ती विराजमान होते. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच बाजारपेठा, वाद्यांची दुकाने, गणेशमूर्ती शाळा, भजनांची तालीम यामुळे परिसरात अक्षरश: भक्तिमय वातावरण निर्माण होते. कामानिमित्त मुंबई, पुणे, गोवा येथे वास्तव्यास राहणारे चाकरमानी गणेशोत्सवास आपल्या गावी येतात. कित्येक दिवसांपासून बंद असणारी घरे यानिमित्ताने उघडली जातात.वैद्यकीय पथके तैनातदरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी २१ ठिकाणी फिक्स पॉर्इंट निश्चित करण्यात आले आहेत. सहा ठिकाणी चारचाकीद्वारे पेट्रोलिंग, तर सात ठिकाणी दुचाकीच्या माध्यमातून पेट्रोलिंग केले जाणार आहे. ठिकठिकाणी वैद्यकीय पथके तैनात ठेवली जाणार आहेत.