शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

सिंधुदुर्ग :  प्रत्येकाच्या अंगभूत कलेला वाव मिळण्यासाठी व्यासपीठ : धुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 17:40 IST

उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्यावतीने दिवाळीनिमित्त आकाश कंदील स्पर्धा २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा लहान गट व खुला गट अशी घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन ग्रंथालयाचे उपाध्यक्ष संजय धुरी यांनी केले.

ठळक मुद्दे प्रत्येकाच्या अंगभूत कलेला वाव मिळण्यासाठी व्यासपीठ : धुरीआकाश कंदील स्पर्धेचे उद्घाटन

देवगड : उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्यावतीने दिवाळीनिमित्त आकाश कंदील स्पर्धा २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा लहान गट व खुला गट अशी घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन ग्रंथालयाचे उपाध्यक्ष संजय धुरी यांनी केले.यावेळी धुरी यांनी दिवाळीत बाजारात विविध तऱ्हेचे आकाश कंदील विक्रीसाठी उपलब्ध असतात. परंतु विविध प्रकारचे रंगीत कागद व बांबूच्या काड्या तसेच इतर साहित्यापासून स्वत: बनविलेला आकाश कंदील आपल्याला जास्त आनंद देतो. हस्तकलेने साकारलेले आकाश कंदील पाहताना त्यांच्यामधील अंगभूत कलेचे सौंदर्य दिसून येते.बर्वे ग्रंथालयातर्फे दरवर्षी पर्यावरणपूरक साहित्यापासून आकाश कंदील बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. प्रत्येकाला त्याच्या अंगभूत कलेला वाव मिळावा, ती लोकांसमोर यावी यासाठी एक व्यासपीठ बर्वे ग्रंथालयाने उपलब्ध करून दिले आहे. याचा जास्तीत जास्त लाभ हौशी कलाकारांनी घ्यायला हवा, असे ते म्हणाले.ग्रंथालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. अजित गोगटे यांनी ग्रंथालयाच्यावतीने अशा स्पर्धा व्यापक स्वरुपात भरविण्याचा आमचा मानस असून त्याला स्पर्धकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे असे सांगून सर्व स्पर्धक आणि उपस्थित श्रोत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी ग्रंथालयाचे सचिव एस. एस. पाटील, शांताराम कर्णिक आणि या स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिद्ध मूर्तिकार व चित्रकार सुहास जोशी उपस्थित होते. सुहास जोशी यांनी आकाश कंदील बनविताना कोणकोणत्या बाबी ध्यानात घ्याव्यात तसेच स्वत:ची कल्पना वापरून आकाश कंदील कसे आकर्षक बनवावेत याविषयी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. गोगटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.लहान गटामध्ये प्रथम क्रमांक ओम कुबल, द्वितीय गायित्री मेस्त्री, तृतीय निखिल तेली आणि उत्तेजनार्थ पारितोषिक सुयश चांदोस्कर व साक्षी हादगे यांना मिळाले. खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक मंदार लाड (जामसंडे), द्वितीय हर्षल पेडणेकर (देवगड), तृतीय साक्षी पारकर (देवगड) आणि उत्तेजनार्थ सृष्टी परब (देवगड) आणि स्मिता शेवडे (जामसंडे) यांना मिळाले.आकाश कंदिलांचे प्रदर्शन स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहामध्ये भरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात आली. इतर स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालयाचे संचालक सदस्य व सांस्कृतिक विभागप्रमुख सागर कर्णिक यांनी केले आणि शेवटी आभार मानले. यावेळी विद्याधर ठाकूर, निखील जगताप, जान्हवी मोरे, रामचंद्र कुबल, व बहुसंख्येने स्पर्धक व रसिक प्रेक्षक उपस्थित होते. 

टॅग्स :Diwaliदिवाळीsindhudurgसिंधुदुर्ग