शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी पादचारी मार्गाचे स्वप्न अखेर साकार, बांधकरवाडीवासीयांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 19:26 IST

कणकवली शहरातील बांधकरवाडीवासीयांचे कोकण रेल्वे मार्गावरील भुयारी पादचारी मार्गाचे स्वप्न अखेर साकार झाले आहे.

कणकवली - कणकवली शहरातील बांधकरवाडीवासीयांचे कोकण रेल्वे मार्गावरील भुयारी पादचारी मार्गाचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. साडेपाच तासांचा मेगाब्लॉक घेऊन कोकण रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदाराचे कामगार अशा २५० जणांनी मेहनत घेऊन १५ मीटर लांबीचा आणि अडीच मीटर  रुंदी व उंचीचा भुयारी पादचारी मार्ग तयार केला आहे. त्यामुळे नागरिकांना या परीसरातून ये-जा करणे सोपे होणार आहे. या भुयारी पादचारी मार्गासाठी प्रीकास्ट पाच आरसीसी बॉक्स वापरण्यात आले आहेत. कणकवली शहरातील बांधकरवाडी भागातून कोकण रेल्वेचा मार्ग गेला आहे. या मार्गामुळे या भागाची विभागणी झाली होती. तेथील नागरिकांना कणकवली शहरामध्ये यायचे असेल तर मोठा वळसा घालावा लागत असे. त्यामुळे याठिकाणी पादचारी मार्ग व्हावा यासाठी बांधकरवाडीवासीय गेली अनेक वर्षे प्रयत्नशील होते. याबाबत नगरसेवक सुशांत नाईक यांनी ग्रामस्थांच्या या मागणीकडे खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर खासदार राऊत यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून या ठिकाणी भुयारी पादचारी मार्ग मंजूर करून घेतला होता. गतवर्षी त्यांच्याच हस्ते या मार्गाचे भूमिपूजन झाले होते. कोकण रेल्वेचे रत्नागिरी येथील रिजनल मॅनेजर यू. एस. शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रिजनल सिनिअर अभियंता नडगे यांच्या उपस्थितीत हे भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी बुधवारी  रात्री १२.३० ते गुरुवारी सकाळी ६ असा साडेपाच तासांचा मेगाब्लॉक या मार्गावर घेण्यात आला. १५ मीटर लांबी आणि अडीच मीटर रुंदी व उंचीच्या या मार्गासाठी तेवढा भाग कापण्यात आला आणि तयार करण्यात आलेले ५ चौकोनी आरसीसी बॉक्स त्याठिकाणी ठेवण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूचा भराव पूर्ण करून कापलेल्या रेल्वे रुळावर प्लेटचा वापर करून गुरुवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पुणे-एर्नाकुलम ही पहिली एक्स्प्रेस त्यावरून मार्गस्थ झाली. त्यानंतर सायंकाळपर्यंत रेल्वे रुळाचे वेल्डींग पूर्ण करून मार्ग ‘जैसे थे’ करण्यात आला. या कामासाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च झाला आहे. या कामासाठी  बांधकरवाडीतील स्थानिक ग्रामस्थांनी कोकण रेल्वे प्रशासनास चांगले सहकार्य केले. हा भुयारी मार्ग पादचा-यांना ये-जा करण्यासाठी आहे. या मार्गामुळे  बांधकरवाडीवासीयांना आता शहरात येण्यासाठी किंवा परत घरी जाण्यासाठी सोय उपलब्ध झाली  आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग