शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सिंधुदुर्ग : भावी पिढीला वाचनाची आवड लावण्याची गरज :अनंत वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 16:06 IST

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व नट वाचनालय बांदा आयोजित ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन येथील नट वाचनालयाच्या संत सोहिरोबानाथ नगरीत झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून अनंत वैद्य बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देबांदा येथे जिल्हा ग्रंथालय अधिवेशननट वाचनालयाच्या सदस्यांचा सत्कार वाचनालयाचे प्रश्न मंत्री, अधिकाऱ्यांशी बोलून मार्गी लावणार

बांदा : धावत्या युगात युवा पिढीही वेगवान झाली आहे. पुस्तके वाचण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. किंबहुना त्यांचा वाचनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निरस झाला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत वाचनाची गोडी लावणे गरजेचे आहे. शिक्षक, शाळा आणि ग्रंथालये यांनी यात पुढाकार घेत भावी पिढीला वाचनाची आवड लावली तरच ही वाचन संस्कृती टिकून राहील, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांनी बांदा येथे केले.सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व नट वाचनालय बांदा आयोजित ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन येथील नट वाचनालयाच्या संत सोहिरोबानाथ नगरीत झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून अनंत वैद्य बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते झाले.

आशुतोष भांगले यानी संत सोहिरोबानाथ अंबिये यांचे पद गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, मानसोपचार तज्ज्ञ तथा साहित्यिक डॉ. रुपेश पाटकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, कार्यवाह मंगेश मसके, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, कुडाळच्या नगरसेविका उषा आठल्ये, बांदा व्यापारी संघाचे सचिव सचिन नाटेकर, नट वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर आदी उपस्थित होते. सकाळी ९ वाजता बांदा शहरातून ग्रंथदिंडी काढून या अधिवेशनाची सुरुवात झाली.अनंत वैद्य पुढे म्हणाले, आजच्या शिक्षण क्षेत्रात केवळ पुस्तकी ज्ञान दिले जाते. शिक्षणाचे धडे देणाºयांनीही इतिहासाची पाने चाळली असतील असे दिसून येत आहे. त्यामुळे या भावी पिढीला वाचनासाठी प्रवृत्त करणार कोण हा एक प्रश्नच आहे अशी खंत व्यक्त केली. वाचनालय किंवा ग्रंथालये चालविताना सर्वांचे सहकार्य आवश्यक असून शिक्षण क्षेत्रातही या वाचनाचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.माजी सभापती प्रमोद कामत म्हणाले, पुस्तके मानवी जीवनाला दिशा देण्याचे काम करत असल्याने वाचनालय हे जीवनात महत्त्वाचे आहे. त्यामुळे वाचनालय बंद न पडता ते अखंडित चालू रहावे यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी प्रमोद कामत, रणजित देसाई, मंदार कल्याणकर, श्रेया गोखले, श्वेता कोरगावकर, डॉ. रुपेश पाटकर, शीतल राऊळ, सचिन नाटेकर, उषा आठल्ये यांच्यासह अधिवेशनाचे योग्य नियोजन करणाऱ्या नट वाचनालयाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय प्रकाश तेंडोलकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन चंद्रकांत सावंत यांनी तर आभार प्रकाश तेंडोलकर यांनी मानले. यावेळी वाचनालयाचे सहकार्यवाह मनोज मालवणकर, उपाध्यक्ष राजेंद्र केसरकर, संचालक एस. आर. सावंत, सुभाष मोरये, शंकर नार्वेकर, निलेश मोरजकर, उर्मिला जोशी उपस्थित होते.वाचनालयाचे प्रश्न मंत्री, अधिकाऱ्यांशी बोलून मार्गी लावणारजिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई म्हणाले, जिल्ह्यातील विविध वाचनालये आदर्शवत काम करीत असून आम्हांला या वाचनालयांचा अभिमान आहे. वाचनालयांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनीही नट वाचनालय हे बांदा गावचे शिरोमणी आहे.

या वाचनालयाच्या कार्याचा गौरव करावा तितका थोडाच आहे. या वाचनालयाचे काही प्रश्न आहेत ते आम्ही शिक्षणमंत्री आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मार्गी लावू असेही त्यांनी आश्वासन दिले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गlibraryवाचनालय