शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मासळी कमी होण्यामागची कारणे शोधणे गरजेचे : विष्णुदास कुबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 16:38 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी अत्याधुनिक साधने असूनही मासळी कमी झाली आहे. त्यामागची कारणे शोधून त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य विष्णुदास कुबल यांनी केले.

ठळक मुद्देमासळी कमी होण्यामागची कारणे शोधणे गरजेचे : विष्णुदास कुबल वेंगुर्लेत मत्स्यसंपत्ती कार्यशाळा 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार गेली कित्येक वर्षे पारंपरिक पद्धतीने व अलीकडच्या काळात आधुनिक पद्धतीने मासेमारी करीत आहेत. पूर्वी साधी जाळी असताना सुद्धा टनावर मासळी मिळायची. आज मच्छिमारीसाठी अत्याधुनिक साधने असूनही मासळी कमी झाली आहे. त्यामागची कारणे शोधून त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य विष्णुदास कुबल यांनी केले.कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या पशुपालन दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय विभागातर्फे येथील साई मंगल कार्यालयात महाराष्ट्राची सागरी मत्स्यसंपत्ती : निरंतर उपयोगिता, विकास आणि व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुबल बोलत होते.

यावेळी यांत्रिक समुद्र्री अभियंता शैलेंद्रकुमार जसवाल, मत्स्य शास्त्रज्ञ अशोक कदम, वेंगुर्ले मच्छिमार सहकारी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र्र कुबल, वेंगुर्ले रापण संघाचे चेअरमन अनंत केळुसकर, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, एफ.एस.आय. मुंबईचे बी. बालनायक, फिशरीज्चे सहाय्यक कमिशनर श्रीकांत वारुंजीकर, एफ.एस.आय. मामुर्गावचे मत्स्य शास्त्रज्ञ एच. डी. प्रदीप, मच्छिमार सहकारी सोसायटीचे सचिव हितेंद्र्र रेडकर, दादा केळुसकर, मत्स्य परवाना अधिकारी सतीश खाडे आदी उपस्थित होते. यावेळी राजेंद्र्र कुबल, बालनायक, गणपत केळुसकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार एच. डी. प्रदीप यांनी मानले.आम्हांला सहकार्य करा : जसवालशैलेंद्र्रकुमार जसवाल म्हणाले, फिशरीज सर्व्हे आॅफ इंडिया नेमके काय आहे याची माहिती मच्छिमारांना देणे व मच्छिमारांच्या समस्या जाणून घेऊन त्या मत्स्य पॉलिसीमध्ये समाविष्ट करुन सोडविण्याचा प्रयत्न करणे हे भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण विभागाचे काम आहे. मच्छिमार नौका पकडणे हे आमचे काम नाही. तरीही मच्छिमारांकडून गैरसमजातून आम्हाला त्रास होतो.

अलिकडेच विजयदुर्ग बंदरात आमचे सागरिका जहाज मच्छिमारांनी अडविले होते. आम्ही मच्छिमारांना सहाय्य करण्यासाठी असून केंद्रसरकारचे कर्मचारी आहोत. त्यामुळे आम्हांला सहकार्य करा. या विभागातर्फे मच्छिमारांचे आर्थिक उत्पन्न कसे वाढविता येईल व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मच्छीविक्री व्यवसाय करता येईल यादृष्टीने आपला विभाग काम करेल, असे सांगितले.

टॅग्स :Fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग