शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

सिंधुदुर्गनगरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज १ जानेवारीपासून आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 16:51 IST

सिंधुदुर्गनगरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज येत्या १ जानेवारीपासून आॅनलाईन होणार आहे तशा हालचाली सुरू झाल्या असून या निर्णयामुळे आरटीओ कार्यालय एजंटमुक्त होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देआरटीओ कार्यालय एजंटमुक्त होण्यास मदतवाहन संबंधित चाचण्यांचे अर्ज आॅनलाईन भरण्याचे बंधनकरक तालुकावार दौऱ्याच्या जानेवारी २०१८ ते जून २०१८ पर्यंतच्या तारखा जाहीर

सिंधुदुर्गनगरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज येत्या १ जानेवारीपासून आॅनलाईन होणार आहे तशा हालचाली सुरू झाल्या असून या निर्णयामुळे आरटीओ कार्यालय एजंटमुक्त होण्यास मदत होणार आहे.आपल्याला नवीन शिकवू अथवा पक्के वाहन परवाना मिळावा, वाहकाची अनुज्ञप्ती, सार्वजनिक वाहनांचे बिल्ले आदीसाठी संबंधित वाहन मालक चालकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ कार्यालयात यावे लागते. मात्र, या ठिकाणी आल्यावर या कार्यालयाची कामकाजाची पद्धत समजत नसल्याने वाहन चालकांना येथील एजंटांची मदत घ्यावी लागते.

वाहन चालकांकडून या एजंटांना चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, काही एजंटांनी वाहन चालकांची लुबाडणूक सुरु केली होती. याबाबत अनेक वेळा वाहन चालकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे लक्ष वेधत नाराजीही व्यक्त केली होती.तसेच हे कार्यालय एजंटमुक्त करण्याची मागणी केली होती. एजंटांपासून वाहन चालकांची मुक्तता करण्यासाठी कार्यालयाचे कामकाज आॅनलाइन केले जात असल्याचे बोलले जात आहे.

शिकावू व पक्की अनुज्ञप्ती, वाहकांची अनुज्ञप्ती, सार्वजनिक वाहनांचे बिल्ले, वाहन संबंधित चाचण्यांचे अर्ज आॅनलाईन भरण्याचे बंधनकरक करण्यात आले आहे. ही कार्यवाही १ जानेवारी २०१८ पासून अंमलात आणली जाणार आहे.

त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षक यांच्या तालुकावार दौऱ्याच्या जानेवारी २०१८ ते जून २०१८ पर्यंतच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

जानेवारी २०१८ - सावंतवाडी दिनांक ३ व ११, मालवण दिनांक ४, कणकवली दिनांक ५ व १२, देवगड दिनांक ८, वेंगुर्ला दिनांक ९, दोडामार्ग दिनांक १५, कुडाळ १६, वैभववाडी १८.फेब्रुवारी - सावंतवाडी दिनांक ५ व १५, मालवण ६, कणकवली ८ व १६, देवगड ९, वेंगुर्ला १४, दोडामार्ग २०, कुडाळ २१, वैभववाडी २२.मार्च - सावंतवाडी दिनांक ५ व १३, मालवण दिनांक ६, कणकवली दिनांक ८ व १५, देवगड दिनांक ९, वेंगुर्ला दिनांक १२, दोडामार्ग दिनांक १६, कुडाळ दिनांक १९, वैभववाडी दिनांक २०.एप्रिल २०१८-सावंतवाडी दिनांक ४ व १२, मालवण दिनांक ५, कणकवली दिनांक ६ व १३, देवगड दिनांक ९, वेंगुर्ला दिनांक १०, दोडामार्ग दिनांक १६, कुडाळ दिनांक १७, वैभववाडी दिनांक १९.मे - सावंतवाडी दिनांक ७ व १५, मालवण ८, कणकवली १० व १७, देवगड ११, वेंगुर्ला १४, दोडामार्ग १८, कुडाळ २१, वैभववाडी २२.जून - सावंतवाडी दिनांक ४ व १२, मालवण दिनांक ५, कणकवली दिनांक ७ व १४, देवगड दिनांक ८, वेंगुर्ला ११, दोडामार्ग १५, कुडाळ १८, वैभववाडी १९. दौरा कार्यक्रमाच्या ठिकाणी शिकावू व पक्की अनुज्ञप्ती, वाहकाची अनुज्ञप्ती, सार्वजनिक वाहनांचे बिल्ले संबंधी चाचणी १ जानेवारी २०१८ पासून सारथी ४.० वर आॅनलाईन पध्दतीने भरलेल्या व शुल्क भरलेले अर्ज स्विकारण्याचे कामकाज केले जाईल.सेवेचा लाभ घ्याविहीत अर्ज सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत स्विकारण्यात येईल. तसेच वरील तारखांना कोणतीही सुटी असल्यास सदर ठिकाणचा दौरा इतर ठिकाणचा दौरा आटोपल्यावरच लगेच कामाच्या दुसऱ्या दिवशी होईल. अर्जदारांनी गैरसोय टाळण्यासाठी वेळेवर उपस्थित राहून सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसsindhudurgसिंधुदुर्ग