शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

सिंधुदुर्ग : मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतींना मुदतवाढ, निवडणूक बिनविरोध, आप्पा लुडबे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:39 IST

मालवण येथील पालिकेच्या विषय समिती सभापतिपदाची निवड अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली. यात आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समितीच्या सभापतिपदी परशुराम उर्फ आप्पा लुडबे, बांधकाम नियोजन विकास समितीच्या सभापतिपदी सेजल परब, महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपदी तृप्ती मयेकर तर उपसभापतिपदी पूजा सरकारे यांची निवड प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी जाहीर केली.

ठळक मुद्देविषय समिती सभापतिपदाची निवड अपेक्षेप्रमाणे बिनविरोध विषय समिती निवडीसंदर्भात मालवण येथील पालिका सभागृहात बैठक

मालवण : येथील पालिकेच्या विषय समिती सभापतिपदाची निवड अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली. यात आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समितीच्या सभापतिपदी परशुराम उर्फ आप्पा लुडबे, बांधकाम नियोजन विकास समितीच्या सभापतिपदी सेजल परब, महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपदी तृप्ती मयेकर तर उपसभापतिपदी पूजा सरकारे यांची निवड प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी जाहीर केली. त्यामुळे सर्व विषय समितींच्या सभापतींना मुदतवाढ देण्यात आली आहे.विषय समिती निवडीसंदर्भात शनिवारी येथील पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मुख्याधिकारी रंजना गगे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सुदेश आचरेकर, नितीन वाळके, आप्पा लुडबे, गणेश कुशे, मंदार केणी, दीपक पाटकर, यतीन खोत, पंकज सादये, आकांक्षा शिरपुटे, पूजा सरकारे, पूजा करलकर, सुनीता जाधव, तृप्ती मयेकर, ममता वराडकर, शीला गिरकर, दर्शना कासवकर आदी उपस्थित होते.आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक सभापतिपदासाठी परशुराम लुडबे, बांधकाम नियोजन विकास समिती सभापतिपदासाठी सेजल परब, महिला बालकल्याण समिती सभापतिपदासाठी तृप्ती मयेकर, उपसभापतिपदासाठी पूजा सरकारे यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते.

त्यामुळे या सर्वांची बिनविरोध निवड डॉ. सूर्यवंशी यांनी जाहीर केली. यात स्थायी समिती अध्यक्ष नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपाध्यक्ष राजन वराडकर हे काम पाहतील असे स्पष्ट करण्यात आले.बांधकाम विकास समितीत सदस्य म्हणून गणेश कुशे, मंदार केणी, पाणीपुरवठा जलनि:स्सारण समितीत राजन वराडकर, पंकज सादये, दर्शना कासवकर, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समितीत आकांक्षा शिरपुटे, ममता वराडकर, महिला बालकल्याण समितीत शीला गिरकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMuncipal Corporationनगर पालिका