शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : विजयदुर्गचा इतिहास अनुभवला, महोत्सवाचा दुसरा दिवस, अमर अडके यांनी दिली किल्ल्याबाबत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 18:32 IST

ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला आठशे वर्षांचा इतिहास आहे. या किल्ल्याची महती फार मोठी असून ६४ दुर्गांपैकी अजूनही बळकट अशा स्थितीत उभा असलेला हा किल्ला आहे. अशा शब्दांत किल्ल्याविषयी ऐतिहासिक महत्त्व सांगत विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास इतिहासतज्ज्ञ डॉ. अमर अडके यांनी विजयदुर्ग येथे कथन केला.

ठळक मुद्दे ६४ दुर्गांपैकी अजूनही बळकट अशा स्थितीत उभा असलेला विजयदुर्ग किल्ला विजयदुर्गवासीयांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या इतिहास अनुभवलाविजयदुर्ग महोत्सवाला अनेक पर्यटकांनी तसेच मान्यवर व्यक्तींनी दिल्या भेटी

देवगड : ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला हा स्थापत्य शास्त्राच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा किल्ला आहे. विजयदुर्ग हा किल्ला तीन तटबंदींच्या सहाय्याने बांधलेला आहे. या किल्ल्यावर तीनही शक्तींची प्रतीके असून बलभीम मारूती, रामेश्वर, भवानीमाता ही त्याची प्रतीके आहेत. या किल्ल्याला आठशे वर्षांचा इतिहास आहे. या किल्ल्याची महती फार मोठी असून ६४ दुर्गांपैकी अजूनही बळकट अशा स्थितीत उभा असलेला हा किल्ला आहे. अशा शब्दांत किल्ल्याविषयी ऐतिहासिक महत्त्व सांगत विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास इतिहासतज्ज्ञ डॉ. अमर अडके यांनी विजयदुर्ग येथे कथन केला.

विजयदुर्ग येथे विजयदुर्ग महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात रविवारी सायंकाळी ४ वाजता डॉ. अमर अडके यांच्यासोबत अनेक पर्यटकांनी तसेच इतिहासप्रेमी व विजयदुर्गवासीयांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या इतिहास अनुभवला. शंभरहून अधिक जनसमुदायाबरोबर तब्बल चार तास डॉ. अमर अडके यांनी विजयदुर्ग किल्ला फिरत किल्ल्याविषयीची माहिती दिली.

तीन दिवस सुरू असलेल्या या विजयदुर्ग महोत्सवाला अनेक पर्यटकांनी तसेच मान्यवर व्यक्तींनी भेटी दिल्या. असाच महोत्सव दरवर्षी विजयदुर्ग येथे करण्यात येणार आहे. या जल्लोषी कार्यक्रमांमुळे गेले तीन दिवस विजयदुर्ग परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे.जल्लोषात निरोपविजयदुर्ग येथे सुरू असलेल्या विजयदुर्ग महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी किल्ले बांधणी स्पर्धा, वाळूशिल्प, रांगोळी प्रदर्शन, मर्दानी खेळ, नौकानयन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. तसेच सरत्या वर्षाला फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात निरोप देण्यात आला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगड