शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड विमानतळ जानेवारीअखेरीस होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 02:21 IST

सुरेश प्रभू यांना लिहिलेल्या ताज्या पत्रात पुरी यांनी म्हटले की, सिंधुदुर्गच्या चिपी ग्रीन फिल्ड विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. डीजीसीएच्या पथकाने त्याची पाहणीही केली आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : सिंधुदुर्ग विमानतळावरून जानेवारीच्या अखेरच्या सप्ताहात विमानांची उड्डाणे सुरू होतील, अशी माहिती नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप एस. पुरी यांनी दिली आहे.सुरेश प्रभू यांना लिहिलेल्या ताज्या पत्रात पुरी यांनी म्हटले की, सिंधुदुर्गच्या चिपी ग्रीन फिल्ड विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. डीजीसीएच्या पथकाने त्याची पाहणीही केली आहे. त्यानुसार आता विमानतळास परवाना दिला जाईल. एटीसी मनोरा आणि हवामानविषयक माहिती निश्चित करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान संयंत्राची तात्काळ उभारणी करण्याच्या सूचना डीजीसीएच्या पथकाने विमानतळ उभारणी करणाऱ्या कंपनीस दिल्या आहेत. अग्निशामक उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही कंपनीस केल्या आहेत. या विमानतळाच्या उभारणीचे काम आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. या कंपनीकडे देण्यात आलेले आहे. उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा कंपनीस जानेवारीपर्यंत पूर्ण करावयाच्या आहेत. पुरी यांच्या पत्रात म्हटले आहे की, अलायन्स एअर या कंपनीला उड्डाणाची परवानगी देण्यात आली आहे. येथील सर्व उड्डाणे आरसीएस उड्डाण योजनेनुसार होतील.सुरेश प्रभू विमान वाहतूक मंत्री होते, तेव्हा त्यांनी या विमानतळासाठी प्रयत्न केले होते. सिंधुदुर्गातून लवकरात लवकर विमान उड्डाणे सुरू व्हावीत, यासाठी ते आजही प्रयत्नशील आहेत.