शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

सिंधुदुर्ग : कणकवलीत रंगणार पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 3:49 PM

कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या कार्यस्थळावर 13 मे रोजी होणारे मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्राचे पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन आगळेवेगळे आणि यशस्वी करण्याचा निर्धार  येथे झालेल्या सहविचार सभेत करण्यात आला.

ठळक मुद्देदिंडी, लघुपट महोत्सव, खाद्यजत्रा, कवितांचा नाट्याविष्कार सहविचार सभेत संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार : विविध समित्यांची स्थापना

कणकवली : येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या कार्यस्थळावर 13 मे रोजी होणारे मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्राचे पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन आगळेवेगळे आणि यशस्वी करण्याचा निर्धार  येथे झालेल्या सहविचार सभेत करण्यात आला.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सिंधुभूमी कला अकादमीचे अध्यक्ष प्रमोद जठार, संमेलनाचे कार्यवाह सतीश लळीत यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. संमेलनाच्या पूर्वसंध्येला शहरातून दिंडी, मालवणी लघुपट महोत्सव, मालवणी खाद्यजत्रा, मालवणी कवितांचा नाट्याविष्कार, काही नाट्यप्रवेश, नाटक असे वेगवेगळे उपक्रमही यानिमित्ताने आयोजित करण्यात येणार आहेत.

दि. १३ मे रोजी होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरणहकार गंगाराम गवाणकर यांची निवड करण्यात आली आहे. उदघाटक म्हणुन पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नीतिन करमळकर उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी संमेलनाध्यक्ष कवि डॉ. महेश केळुसकर अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करण्यासाठी खास उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाच्या व त्यानिमित्ताने आयोति केलेल्या अन्य कार्यक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी अकादमीचे कार्यवाह कवी मधुसुदन नानिवडेकर, विजय गावकर, अभय खडपकर, श्याम नाडकर्णी, विलास खानोलकर, कमलेश गोसावी, डॉ. सई लळीत, डॉ. संदीप नाटेकर, विकास गावकर, कुणाल मांजरेकर, राजश्री धुमाळे, कल्पना मलये, राजस रेगे, रवींद्र मुसळे, डॉ. विठ्ठल गाड, महेश खोत, डॉ. रामदास बोरकर, रोहन पारकर, सचिन शिरवलकर, गीतांजली कामत, सुप्रिया तायशेटे, प्राची कर्पे आणि  अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी संमेलन व अन्य कार्यक्रमांसदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली व काही महत्वाच्या समित्या स्थापन करण्यात आल्या. मालवणी लघुपट महोत्सव समिती (अध्यक्ष विजय गावकर), मालवणी खाद्यजत्रा समिती (अध्यक्षा राजश्री धुमाळे), दिंडी आयोजन (विवेकानंद वाळके), नेपथ्य व सजावट समिती (अध्यक्ष डॉ. संदीप नाटेकर), निमंत्रण व साहित्यिक संपर्क समिती (अध्यक्ष श्याम नाडकर्णी), मंडप व्यवस्था समिती (अध्यक्ष समर्थ राणे), प्रसिद्धी समिती (अध्यक्ष सतीश लळीत), हास्यकवि संमेलन समिती (अध्यक्ष कमलेश गोसावी) अशा अनेक समित्या नेमण्यात आल्या. संमेलनाच्या प्रारंभी पारंपरिक गाऱ्हाणे घालण्याची व संमेलनातील कायक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी विलास खानोलकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.या समित्यांच्या स्वतंत्र बैठका होऊन सदस्यांची नेमणुक करण्यात येणार आहे. कणकवली शहर व परिसरातील वेगवेगळ्‌या क्षेत्रातील मान्यवरांना या समित्यांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. संमेलनाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमांचे आणि सामाजिक माध्यमांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

पाचवे मालवणी बोली साहित्य संमेलन आणि त्या अनुषंगाने आयोजित सर्व कार्यक्रम हे सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करायचे आहेत. त्यामुळे सर्वांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष प्रमोद जठार व कार्यवाह सतीश लळीत यांनी केले आहे.मालवणी कवितांना मिळणारा प्रतिसाद पाहता कविसंमेलनासाठी एक तास वेळ देण्यात आला आहे. तसेच, याला जोडुनच हास्यकवि संमेलनही होणार आहे. मालवणी कवितांच्या नाट्याविष्कारही सादर करण्यात येणार आहे. संमेलनाची सविस्तर कार्यक्रमपत्रिका लवकरच जाहीर केली जाणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcultureसांस्कृतिक