शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : दुर्लक्षितपणामुळे अपघाताची भीती, मळेवाड-कोंडुरा येथील ब्रिटिशकालीन पुलाची डागडुजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:30 IST

मळेवाड-कोंडुरा येथील ब्रिटिशकालीन पुलाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी आवश्यक ती कोणतीही खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली नाही. या दुर्लक्षितपणामुळे त्याठिकाणी वाहन अपघात होण्याची भीती नागरिक तसेच वाहनचालकांतून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देदुर्लक्षितपणामुळे अपघाताची भीती,  वाहन चालविणे धोकादायकमळेवाड-कोंडुरा येथील ब्रिटिशकालीन पुलाची डागडुजी 

सावंतवाडी : मळेवाड-कोंडुरा येथील ब्रिटिशकालीन पुलाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी आवश्यक ती कोणतीही खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली नाही. या दुर्लक्षितपणामुळे त्याठिकाणी वाहन अपघात होण्याची भीती नागरिक तसेच वाहनचालकांतून व्यक्त होत आहे.मळेवाड-कोंडुरा या सार्वजनिक बांधकामच्या महामार्गावर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाचे नवीन बांधकाम सध्या सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पाणी येत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णत: कोलमडत असे. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पुलाची मागणी गेली कित्येक वर्षे लोकांकडून केली जात होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले असून त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत सुरू असलेल्या या कामाच्या ठिकाणी संबंधित विभागाने तसेच ठेकेदाराने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे टाळले असून केव्हाही अपघात होऊ शकतो अशी शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. पुलाच्या बांधकामाच्या बाजूने पर्यायी रस्ता काढून त्या रस्त्याने वाहतूक सुरू आहे.मात्र, या पुलाच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी दिशादर्शक, बॅरिकेट्स तसेच धोेकादायक सूचना फलक किंवा रिफ्लेक्टर लावणे आवश्यक असताना तशी कोणतीही व्यवस्था त्या कामाच्या ठिकाणी करण्यात आली नाही.

एका बाजूने पुलाचे काम, तर दुसऱ्या बाजूने नदीचे पात्र अशा दोन्ही संकटाच्या मधून वाहनचालकांना तेथून मार्ग काढावा लागत आहे. मात्र, अपघात होऊ नये याची खबरदारी म्हणून त्याठिकाणी कोणतीही उपाययोजना न राबविल्याने दिवसा सोडाच, पण रात्रीच्या वेळी वाहन चालविणे धोकादायक ठरत आहे.मळेवाडहून कोंडुऱ्याच्या दिशेने येत असताना पुलाच्या कामाच्या आधी रस्त्याला वळण आहे. त्यामुळे हे काम वाहनचालकांच्या दृष्टीस येत नाही. त्यामुळे एखादा वाहनचालक थेट पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात जाऊन अपघात होऊ शकतो. याबाबत बांधकाम विभागाने गांभीर्याने घेत याबाबत विचार करून खबरदारी घेणे गरजेचे आहे.पुलाचे काम धिम्यागतीनेपालक मंत्री दीपक के सरकर यांनी कोंडुरा येथील ब्रिटिशकालीन पुलाच्या कामाची अलीकडेच येथील विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत चौकशी करीत अधिकाऱ्यांना काम लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मात्र, असे असूनही पुलाचे काम धिम्यागतीने सुरू असून, पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक असताना या पुलाचे काम वेळेत पूर्ण होणार का? असा प्रश्न स्थानिकांतून विचारला जात आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpwdसार्वजनिक बांधकाम विभाग