शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग शैक्षणिकदृष्ट्या राज्यात आघाडीवर

By admin | Updated: February 7, 2017 23:05 IST

‘प्रथम’ संस्थेचा अहवाल : सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या घेतल्या चाचण्या

सिंधुदुर्गनगरी : शैक्षणिक गुणवत्तेचा देशव्यापी अहवाल देणाऱ्या ‘प्रथम’ अशासकीय संस्थेच्या ‘असर’ या अहवालानुसार सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यात शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर आहे. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणित व पुस्तक वाचन या दोन विषयांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यातून हे चित्र समोर आले आहे. या यादीत सातारा जिल्हा दुसऱ्या, तर रत्नागिरी जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे.‘प्रथम’ ही एक स्वयंसेवी संस्था असून, या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील सरकारी शाळांमधील गुणवत्तेचे चित्र समोर आणले आहे. यात शैक्षणिक दर्जा, भौतिक सुविधा हा निकष समोर ठेवून राज्यात एकच अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार प्रसिद्ध झालेल्या अहवालात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता बहरत असल्याचा अहवाल ‘असर’ या स्वयंसेवी संस्थेने जाहीर केला आहे. या निमित्ताने येथील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकामध्येही वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना ‘अच्छे दिन’ आल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.त्यानंतर इयत्ता दुसरीचा मजकूर वाचता येण्याचे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे राज्यात सरासरी प्रमाण ७१.६ टक्के आहे. यात अव्वल क्रमांक सोलापूर जिल्ह्याने पटकाविला असून, दुसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. याची सरासरी ८८ टक्के आहे. तर तृतीय क्रमांकावर रत्नागिरीचा समावेश आहे. याही प्रकारात नंदुरबार जिल्हा राज्यात शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तिसरी ते पाचवी बजाबाकी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सरासरी ३९.१ टक्के एवढे आहे. या प्रकारात मात्र सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला असून, त्याची सरासरी टक्केवारी ५६.९ टक्के आहे. तर प्रथम क्रमांकावर सातारा जिल्हा असून, त्याची टक्केवारी ६४.२ टक्के एवढी आहे. याही प्रकारात नंदुरबार जिल्हा राज्यात शेवटी आहे. (प्रतिनिधी)सातारा जिल्हा दुसऱ्या, तर रत्नागिरी तिसऱ्या स्थानीइयत्ता पहिलीच्या पुस्तकातील मजकुराचे वाचन करू शकणाऱ्या इयत्ता तिसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचे राज्यात सरासरी प्रमाण ७२.५ टक्के आहे. यात अव्वल क्रमांक सिंधुदुर्गने पटकाविला असून, त्याची ९४ एवढी टक्केवारी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सातारा जिल्हा असून, त्याची टक्केवारी ९२.५ एवढी आहे. तृतीय क्रमांकावर रत्नागिरी जिल्हा असून, त्याची टक्केवारी ९१.४ एवढी आहे. सर्वांत शेवटचा क्रमांक नंदुरबार जिल्ह्याचा असून, त्याची टक्केवारी ५१.१ एवढी आहे.