शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 17:06 IST

CoronaVIrus Sindudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा रेड झोन होण्यास सत्ताधारी पालकमंत्री, खासदार व आमदार जबाबदार आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही अवस्था झालेली आहे. आतापर्यंत ६०० च्या वरती रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता सिंधुदुर्ग रेडझोन होण्यास जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी  ऑनलाईन पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्दे सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये : परशुराम उपरकर कोविड रोखण्यासाठी खासगी डॉक्‍टरांचा पुढाकार आवश्यक

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा रेड झोन होण्यास सत्ताधारी पालकमंत्री, खासदार व आमदार जबाबदार आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही अवस्था झालेली आहे. आतापर्यंत ६०० च्या वरती रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता सिंधुदुर्ग रेडझोन होण्यास जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी  ऑनलाईन पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की, जिल्हा रुग्णालयातील नर्सेसच्या आंदोलनामुळे वास्तव जनतेसमोर आले आहे. मागण्यांसाठी नर्सेसना कोरोना कालावधीत आंदोलन करावे लागते, हे दुर्दैव आहे. आता यापुढे कोरोना रोखण्यासाठी खासगी डॉक्‍टरांचा पुढाकार आवश्यक आहे, तरच या आजारावर नियंत्रण मिळविता येईल. जिल्ह्यातील ज्या लोकांनी खासदार, आमदारांना निवडून दिले, ते लोक कोरोनामुळे त्रस्त झाले असताना, त्यांची काळजी घ्यायला कोणीच नसल्याची सध्याची स्थिती आहे.जिल्हा रुग्णालयातील सेवा कोलमडलेलीजिल्हा रुग्णालयातील सेवा कोलमडली आहे. पीएम केअर योजनेमधून मिळालेले व्हेंटिलेटर अद्याप जोडलेले नाहीत; तर पालकमंत्र्यांच्या घोषणा प्रत्यक्षात उतरत नाहीत. त्यांनी जिल्ह्यासाठी अद्याप शववहिनी दिलेली नाही, रुग्णवाहिका दिल्या, पण त्यासाठी चालक नाहीत.

रॅपिड टेस्ट वाढवल्याने रुग्ण मिळत आहेत, पण त्यांच्यावर योग्यप्रकारे उपचार होत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात जनतेसाठी सेवा देण्याची गरज आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक तिथेच राहत आहेत. ते तिथेच झोपतात आणि मग घरी जातात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होत आहे.नागेश पवार यांची बदली रद्द करावीडॉ. नागेश पवार यांची बदली रद्द करावी. त्यांना जिल्ह्यात काम करायचे असून, पालकमंत्र्यांनी त्यांची बदली थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत. नर्सना त्रास देत असलेले डॉक्टर पालकमंत्र्यांनी बोलावूनदेखील बैठकीत उपस्थित राहात नाहीत. त्यामुळे कोणाचाच वचक राहिलेला नाही. मेडिकल कॉलेजसाठी मंजूर असलेले ५०० डॉक्टर, कर्मचारी तत्काळ भरा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला दिलासा द्या, अशी मागणीही परशुराम उपरकर यांनी यावेळी केली.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग