शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी पांढरपट्टे उतरले भात लावणीस, बळीराजासाठी एक दिवस उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:53 IST

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १४४२ प्राथमिक शाळांमध्ये बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमाची दमदार सुरुवात झाली आहे. या उपक्रमात शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी, पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत उपक्रम यशस्वी केला आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पांढरपट्टे उतरले भात लावणीसबळीराजासाठी एक दिवस उपक्रमसिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे आयोजन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १४४२ प्राथमिक शाळांमध्ये बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमाची दमदार सुरुवात झाली आहे. या उपक्रमात शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी, पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत उपक्रम यशस्वी केला आहे.

दरम्यान या उपक्रमाचा जिल्हास्तर शुभारंभ पणदूर येथे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या उपस्थितीत सकाळी पार पडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतात उतरत लावणी केली.पणदूर येथील शेतावर बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमासाठी उपाध्यक्ष रणजित देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. जगताप, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, माजी अध्यक्षा सरोज परब, पणदूर सरपंच दादा साईल, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, कृषी अधीक्षक शिवाजी शेळके, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र आंगणे, सुनिल वारंग, विद्यार्थी, पालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा परिषदने विद्यार्थ्यांना शेतीची महती सांगणारा राबविलेला बळीराजासाठी एक दिवस हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. शेतीबद्दलची माहिती व महत्व ज्याला समजले तो खरच खूप भाग्यवान आहे असे मी समजतो. शेतीच्या माध्यमातून मिळणारे यश हे मनाला समाधान देते. शाळेत शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी सचिन तेंडुलकर बनणार नाही पण शेतीतून आदर्शवत शेतकरी मात्र नक्की बनतील. भविष्यात शेती शिक्षण तेवढेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.बालवयातच शेतीचे महत्व रूजायला हवेरेश्मा सावंत म्हणाल्या, युवा पिढीचा शेतीकडे कल कमी होवू लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्यावतीने हा उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. बालवयातच शेतीचे महत्त्व रूजायला हवे आणि तसे झाल्यास जिल्ह्यात प्रगत व समृद्ध शेतकरी निर्माण होतील.

विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक जागृती व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या शेतात भाजीपाला, भातशेती यासह अन्य पिकांची लागवड केल्यास शेतीविषयक प्रेम निर्माण होऊन या उपक्रमाचा उद्देश सफल होईल असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमाचा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी शुभारंभ केल्यानंतर विद्यार्थ्यांसमवेत शेतात लावणी केली.