शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या सोयीसुविधांमुळे सिंधुदुर्ग जिल्हा पिछाडीवर- आज राष्ट्रीय क्रीडादिन :

By admin | Updated: August 28, 2014 22:23 IST

जिल्ह्यात क्रीडा चळवळीसाठी प्रयत्न आवश्यक

विनायक वारंग - वेंगुर्ले-पर्यटन, सांस्कृतिक, कला, राजकारण आदी क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर आहे. मात्र, जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील स्थितीचा विचार करता जिल्हा मागे पडल्याचेच चित्र आहे. क्रीडा क्षेत्रातील अपुऱ्या सोयी, अत्यल्प आर्थिक सहाय्य, मैदानांची झालेली दुरवस्था, क्रीडाविषयक धोरणे नसणे यामुळे क्रीडाक्षेत्र मागासलेले राहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंनी, सामाजिक संस्थांनी, क्रीडा संघटनांनी व मंडळांनी एकत्र येत क्रीडा क्षेत्राच्या यशस्वीतेसाठी लढा उभारणे गरजेचे बनले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेळात प्राविण्य असणारे अनेकजण आहेत. परंतु त्यांच्यातील कोणी आर्थिक अडचणीमुळे तर कोणी अपुऱ्या प्रशिक्षणामुळे मागे राहत आहेत. यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे बनले आहे. जिल्ह्यात विविध क्रीडा मंडळांमार्फत विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. क्रीडामंडळांनी एवढ्यावरच मर्यादीत न राहता एकाच खेळाच्या आयोजनासह अन्य खेळांकडेही लक्ष पुरविणे गरजेचे आहे. तसेच स्पर्धा आयोजनाआधी प्रशिक्षणाची सोयही केल्यास खेळाडूंना योग्य सराव व मार्गदर्शन लाभेल. यातून उत्कृष्ट खेळाडू निर्माण होतील. यावेळी शासनाने अशा मंडळांना उत्स्फूर्तपणे साथ देणे आवश्यक असून क्रीडाक्रांतीकरिता धडपडणाऱ्या मंडळांना शासनाने साहित्य खरेदी व प्रशिक्षणासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन देत त्यांच्या योग्य वापरावर निगराणी ठेवण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे शासनाने प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहाचा घाट घातला आहे तसेच क्रीडांगणाकरिताही प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील उपलब्ध क्रीडांगणांच्या देखभालीचीही जबाबदारी सर्वांनीच उचलली पाहिजे.जिल्ह्यात क्रीडा विकासाचा ध्यास घेतलेल्या संस्थांना शासनाने मदत करणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यात क्रीडा केंद्र सुरु केले पाहिजे. काही ठिकाणी क्रीडा केंद्रे सुरु आहेत. मात्र, खेळाडूंनी अपुऱ्या सुविधांमुळे दुर्लक्ष केले आहे. वेंगुर्ले येथील क्रीडा केंद्र तर मैदान बनविण्यावरुनही वादात आहे. आजही या मैदानावरील धावपट्टीचे काम योग्य नाही. मैदानावर पाणी साठून राहते, पाण्यासाठी कोणतेही नियोजन केलेले नाही.ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये कलागुण ठासून भरलेले असतात. मात्र, सोयीसुविधांच्या अभावामुळे ते मागे पडतात. परिश्रम करण्याची जिद्द असते. मात्र, पोषण आहार मिळत नसल्याने शारीरिक सुदृढता येत नाही. त्यामुळे परिश्रमावरही परिणाम होतो. तसेच खेळाच्या साहित्याची असणारी कमतरताही मोठी समस्या बनत चालली आहे. अलिकडे खेळाच्या क्षेत्राला व्यवसायाचे व व्यवस्थापनाचे स्वरुप प्राप्त होत आहे. स्पर्धा आयोजन आर्थिकदृष्ट्या न परवडणारे व व्यवस्थापनही कठीण होत आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा जास्तीत जास्त योग्य वापर होणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये क्रीडा साहित्य, मैदाने व मार्गदर्शनाची सोय उपलब्ध केली पाहिजे. यासाठी क्रीडा संघटनांनीही एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. तरच जिल्हात क्रीडा चळवळ सुरु होईल.जिल्हा क्रीडा विभागाचा पुढाकार आवश्यकजिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाकरिता जिल्हा क्रीडा विभागाच्या पुढाकाराची आवश्यकता आहे. ओरोस येथे उपलब्ध मैदाने विनावापर पडून असतात. मात्र, वापरासाठी मागणी केली असता, संस्थांना भाडे आकारले जाते आणि संस्था हे भाडे खेळाडूंकडून वसूल करते. क्रीडा विभागाने मैदान व साहित्य तोडफोड न करण्याच्या अटीवर विनाभाडे वापरण्यास दिल्यास खेळाडूंना बसणारा आर्थिक भुर्दंड कमी होईल. यासाठी जिल्हा क्रीडा विभागाने खेळाडूंमधील गुणवत्ता ओळखून त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. क्रीडादिन विशेष