शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणा, दोडामार्ग बाजारपेठेतील प्रकार : शाब्दिक बाचाबाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 18:14 IST

जीवाचा गोवा करून आलेल्या मद्यधुंद पर्यटकांनी शुक्रवारी दोडामार्ग बाजारपेठेत धिंगाणा घातला. या धिंगाण्यात पर्यटकांची चारचाकी दुचाकीला लागून अपघातही झाला. यावरून दुचाकीस्वार व पर्यटकांत शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण तंग झाले.

ठळक मुद्दे मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणादोडामार्ग बाजारपेठेतील प्रकार शाब्दिक बाचाबाची

दोडामार्ग : जीवाचा गोवा करून आलेल्या  मद्यधुंद पर्यटकांनी शुक्रवारी दोडामार्ग बाजारपेठेत धिंगाणा घातला. या धिंगाण्यात पर्यटकांची चारचाकी दुचाकीला लागून अपघातही झाला. यावरून दुचाकीस्वार व पर्यटकांत शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण तंग झाले.वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही पर्यटकांनी केला. अखेर पर्यटकांच्या गाडीत असलेल्या माहिलांनी झाल्या प्रकाराची माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.गेल्या दोन वर्षात दोडामार्ग शहरात दारूच्या नशेत पर्यटकांकडून धिंंगाणा घालणे, राडा करणे आणि स्थानिकांना मारहाण करण्याचा प्रकार अनेकदा घडला. त्यामुळे शांत असलेले दोडामार्ग अनेकदा अशांत बनले. वर्षा पर्यटनासाठी मांगेलीत येणाऱ्या पर्यटकांकडून अनेकदा असे प्रकार घडले. असाच प्रकार शुक्रवारी दोडामार्गमध्ये घडला.कोल्हापूर येथील पर्यटक गोव्यात फिरायला गेले होते. त्याठिकाणी मद्याचे घोट रिचवित जीवाचा गोवा केल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघाले. दोडामार्ग बाजारपेठेत काही वेळ ते थांबले. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या महिला खरेदीसाठी गेल्या.

यादरम्यान आधीच मद्यधुंद असलेल्या त्या पर्यटकांमध्ये वाद सुरू झाला. त्यातच त्यातील एकाने गाडीचा क्लज दाबल्याने त्यांची चारचाकी समोर उभ्या करून ठेवलेल्या दुचाकीला धडकली. त्यामुळे दुचाकीस्वार व पर्यटकांमध्ये नुकसान भरपाईवरून वाद सुरू झाला.प्रकरण हातघाईवर आले. याची माहिती वाहतूक पोलीस राजा राणे यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

मात्र मद्यधुंद पर्यटकांनी त्यांच्याशीही हुज्जत घालून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण आणखीनच चिघळले. अखेर पर्यटकांसोबत असलेल्या महिलांनी माफी मागितल्यानंतर या प्रकारावर पडदा पडला.मद्यधुंद पर्यटकांना आपण काय बोलतो त्याचेही भान नव्हते. घटनास्थळी दाखल झालेले वाहतूक पोलीस राजा राणे यांच्याशी त्यांनी अरेरावी केली. त्यांच्या अंगावरही धावून गेले.तुमच्या हातून काय कारवाई होणार हे माहिती आहे. तुम्ही फक्त एफआयआरच दाखल करणार ना? खुशाल करा, अशी उध्दट भाषा वापरली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटनAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशन