शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

सिंधुदुर्ग : कुडाळ शहरात बॉक्सवेलऐवजी उड्डाण पूल बांधण्याची मागणी : नागेंद्र परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 17:22 IST

कुडाळ शहरातील महामार्गावर बॉक्सवेलऐवजी उड्डाण पूल बांधण्यात यावे, असा प्रस्तावही त्यांच्या सुचनेनुसार मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र परब यांनी दिली.

ठळक मुद्देकुडाळ शहरात बॉक्सवेलऐवजी उड्डाण पूल बांधण्याची मागणी : नागेंद्र परबराष्ट्रीय महामार्ग विभागाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला

सिंधुदुर्ग : कुडाळ शहरातील महामार्गावर बॉक्सवेलऐवजी उड्डाण पूल बांधण्यात यावे, असा प्रस्तावही त्यांच्या सुचनेनुसार मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र परब यांनी दिली.

महामार्गाच्या चौपदरीकरण कामादरम्यान नागरिकांकडून वेळोवेळी प्राप्त सूचना, समस्या व तक्रारी यांची दखल खासदार विनायक राऊत यांनी घेऊन तशाप्रकारचे शक्य असलेले बदल व उपाययोजना नॅशनल हायवे आॅथॉरिटी, सार्वजनिक बांधकाम (महामार्ग)चे अधिकारी व संबंधित ठेकेदार कंपनी यांचेकडून प्रयत्नपूर्वक करून घेतलेले असल्याने कुडाळ व वागदे येथे ६० मीटरऐवजी ४५ मीटरच जमीन संपादित केली जाणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, सतीश कुडाळकर, नागेश नाईक हे उपस्थित होते.परब यांनी सांगितले की, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू असून हे काम सुरू असताना येथील वाहनचालक, ग्रामस्थ, व्यापारी व इतर सर्व संबंधित घटकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच काही ठिकाणी महामार्गाचे स्वरूप तेथील जनतेला अपेक्षित असावे असे करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी तसेच विविध संघटनांकडून केली जात आहे.

त्यामुळे या सर्वांच्या तक्रारी, सूचना व मागण्या विनायक राऊत यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी याबाबत चौपदरीकरणाच्या कामात शक्य असलेले बदल अधिकारी व कंपनी यांच्याकडून करून घेण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.कुडाळ शहर व कणकवली तालुक्यातील वागदे येथील नागरिकांनी चौपदरीकरणासाठी ६० मीटरऐवजी ४५ मीटरचेच संपादन करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार वागदे व कुडाळ येथील महामार्गासाठी ६० मीटरऐवजी ४५ मीटर जमीन संपादित करण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगत पिंगुळी येथील वडगणेश मंदिर व साई मंदिर संरक्षित करणे किंवा इतर काही प्रश्न असतील असे अनेक प्रश्न वेळोवेळी निदर्शनास आल्यावर त्याचे निराकरण खासदार राऊत यांनी करून घेतलेले आहे, असे त्यांनी सांगितले...तोपर्यंत कुडाळ महामार्गाचे काम बंद!कुडाळ शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणात बॉक्सवेलऐवजी उड्डाण पूल बांधण्याचा प्रस्ताव मंजूर होऊनही तो पूर्ण होत नाही तोपर्यंत कुडाळ महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बंद राहील, असेही नागेंद्र परब यांनी सांगितले.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग