शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुुदुर्ग : आंबा कॅनिंग खरेदी कमी दराने, वेंगुर्लेत बागायतदार, शास्त्रज्ञांच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 12:42 IST

आंबा कॅनिंग खरेदी घेताना कमी दर देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. आंबा कॅनिंगला प्रति किलो ४२ ते ४५ रुपये मिळणे आवश्यक असून, याप्रश्नी शासनस्तरावरून शेतकरी व कारखानदार यांची बैठक घेण्याचा निर्णय वेंगुर्ले तालुका आंबा काजू बागायतदार व शास्त्रज्ञ यांच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देआंबा कॅनिंग खरेदी कमी दराने, वेंगुर्लेत बागायतदार, शास्त्रज्ञांच्या बैठकीत निर्णय शासनस्तरावर निर्णय होण्याची गरज

सिंधुुदुर्ग : आंबा कॅनिंग खरेदी घेताना कमी दर देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. आंबा कॅनिंगला प्रति किलो ४२ ते ४५ रुपये मिळणे आवश्यक असून, याप्रश्नी शासनस्तरावरून शेतकरी व कारखानदार यांची बैठक घेण्याचा निर्णय वेंगुर्ले तालुका आंबा काजू बागायतदार व शास्त्रज्ञ यांच्या बैठकीत घेण्यात आला.वेंगुर्ले तालुका आंबा काजू बागायतदार व शास्त्रज्ञ मंचची सभा मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्र वेंगुर्ले येथे झाली.

यावेळी फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. एन. सावंत, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. प्रकाश बोवलेकर, हनुमंत आंगचेकर, विलास ठाकूर, सदाशिव आळवे, कमलाकांत शेणई, दाजी धुरी, भारत होडावडेकर, प्रकाश गडेकर, गुंडू नाईक, फ्रान्सिस फर्नांडिस, चंद्र्रशेखर सातार्डेकर, बाबी चिपकर आदी आंबा-काजू बागायतदार उपस्थित होते.शेतकरी, कारखानदार बैठकीसाठी प्रयत्नसंजय सामंत यांनी बँक आॅफ इंडिया वेंगुर्ले शाखेच्या अधिकाऱ्यांनी १४५ शेतकऱ्यांची विमा रक्कम भरलेली असूनही ती पाठविली नसल्याने सुमारे सहा लाख रुपये रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकली नाही. या प्रकाराला बँक जबाबदार असल्याने ती रक्कम तत्काळ संबंधित शेतकऱ्यांना देण्यासंबंधी झालेल्या कारवाईची माहिती दिली.

नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होते. मात्र, नुकसान भरपाई देण्याची तरतूद असताना शासनाच्या नाकर्तेपणामुळे ती रक्कम अद्यापही मिळू शकली नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

आंबा कॅनिंगला प्रति किलो ४२ ते ४५ रुपये असणे आवश्यक असून याप्रश्नी शासनस्तरावरून शेतकरी व कारखानदार यांची बैठक घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. आंबा व काजूच्या सद्यस्थितीविषयी उपस्थित शास्त्रज्ञांनी माहिती दिली.

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग