शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

वेर्ले येथील धरणांमुळे ॲडव्हेचर स्पोर्ट्स ला फायदा, दीपक केसरकर यांचं विधान

By अनंत खं.जाधव | Updated: January 18, 2025 21:22 IST

Deepak Kesarkar News: वेर्ले येथील धरणांमुळे परिसरातील बागायतदार मोठा फायदा होणारच आहे.त्याशिवाय या धरणाचा फायदा पर्यटन दृष्ट्या ॲडव्हेचर स्पोर्ट्स साठी होईल.अनेक पर्यटक धरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या परिसरात येतील सह्याद्रीतील पर्यटन वाढेल असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

सावंतवाडी - वेर्ले येथील धरणांमुळे परिसरातील बागायतदार मोठा फायदा होणारच आहे.त्याशिवाय या धरणाचा फायदा पर्यटन दृष्ट्या ॲडव्हेचर स्पोर्ट्स साठी होईल.अनेक पर्यटक धरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या परिसरात येतील सह्याद्रीतील पर्यटन वाढेल असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

वेर्ले येथील मदृ व जलसंधारण विभागाच्या वतीने वेर्ले येथे उभारण्यात येत असलेल्या धरण प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी आमदार केसरकर यांच्या उपस्थितीत धरण स्थळावर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता रामचंद्र धोत्रे भुषण नार्वेकर शाखा अभियंता सौरभ अहिर अशुतोष यादव जिल्हा नियोजन सदस्य सचिन वालावलकर, चंद्रकांत गावडे, शिंदे सेनेचे अशोक दळवी बबन राणे कंत्राटदार प्रकाश पाटील बाबासाहेब शिंदे जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर पंढरी राऊळ पंढरीनाथ राऊळ जीवन लाड राजन रेडकर आदि उपस्थित होते.

केसरकर म्हणाले,शिरशिंगे येथील बंद असलेला धरण प्रकल्प आता नव्याने सुरू होत आहे.पण या धरणाचा फायदा हा वेर्ले गावाला होणार नाही.हे गाव एक ठराविक उंचीवर आहे.त्यामुळेच वेर्ले येथे  मृद जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा धरण प्रकल्प उभा राहणार आहे.वेर्ले येथील हे धरण  दहा कोटि रुपये खर्च करून मंजूर करण्यात आले आहे हे धरण ३२५.०० मीटर उभारण्यात येणार आहे तर या धरणामध्ये पाणीसाठा ३०.४९ दशलक्ष घनफुट साठवण क्षमता असून या धरणाचे पाणलोट क्षेत्र ५.८० चौ. कि.मी. इतके आहे आणि या धरणातून सिंचन क्षेत्र २४८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे केसरकर म्हणाले.

वेर्ले येथील धरण प्रकल्पाचा फायदा हा पर्यटन वाढीसाठी होणार आहे.धरणाचा फायदा हा आंबोली परिसरातील अॅडव्हेचर स्पोर्ट्स साठी होणार असून वेर्ले येथील बागायतदारांना पाणी मिळणार आहे.अधिकची जमिन ओलिताखाली येईल येथील बागायतदारांना अनेक नवनवीन बाजारपेठा उपलब्ध होणार असल्याचे केसरकर यावेळी म्हणाले .उपविभागीय अभियंता धोत्रे यांनी धरण प्रकल्पा बाबत माहिती दिली तसेच वेर्ले येथील धरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे भविष्यात पाण्याचा प्रश्न सुटेल आणि अधिकचे क्षेत्र हे ओलिताखाली असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग