शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

सिंधुदुर्ग : दोघा व्यावसायिकांवर गुन्हा, कोळंब खाडीपात्रात अनधिकृत जलपर्यटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 17:11 IST

कोळंब खाडीपात्रात अनधिकृतरित्या जलपर्यटन व्यवसाय करणाऱ्या दोन व्यावसायिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बंदर विभागाच्या सुषमा कुमठेकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सागरी व खाडीपात्रातील जलपर्यटनास बंदीचे उल्लंघन करून अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोमीन यांनी दिली.

ठळक मुद्देदोघा व्यावसायिकांवर गुन्हा, बंदर निरीक्षकांनी दिली तक्रारकोळंब खाडीपात्रात अनधिकृत जलपर्यटन

मालवण : कोळंब खाडीपात्रात अनधिकृतरित्या जलपर्यटन व्यवसाय करणाऱ्या दोन व्यावसायिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

बंदर विभागाच्या सुषमा कुमठेकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सागरी व खाडीपात्रातील जलपर्यटनास बंदीचे उल्लंघन करून अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोमीन यांनी दिली.अनधिकृत पर्यटन बोटिंग व्यवसाय संबंधित व्यावसायिकांकडून सुरू असल्याने गुरुवारी सकाळी ११.३० वाजता बंदर निरीक्षक कुमठेकर यांनी कोळंब खाडी येथील खापरेश्वर मंदिरानजीक बोटिंग व्यवसाय सुरू असल्याने दुपारच्या सत्रात पोलीस बंदोबस्तात पाहणी केली. यावेळी वेंगुर्ला बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, भाऊ नार्वेकर, गावकर आदी बंदर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.सुषमा कुमठेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत कोळंब खाडीपात्रात अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या सत्यवान उद्धव खराडे (कोळंब) व सतीश रामचंद्र आचरेकर (मेढा) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी मालवण पोलिसांनी कुमठेकर यांच्या तक्रारीनंतर दोघा व्यावसायिकांवर सायंकाळी उशिरा गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोमीन या करीत आहेत.दंडही केला वसूलकोळंब खाडीपात्रात जलक्रीडा प्रकारांवर बंदी असताना अनधिकृत जलपर्यटन सुरू असल्याची माहिती बंदर विभागाला प्राप्त झाली होती. बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बोटिंग व्यावसायिकांना यापूर्वी कारवाईची नोटीस बजावून दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आली होती.

टॅग्स :tourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्ग