लोकमत न्यूज नेटवर्क, सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या आणि थेट सरपंच पदांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत रिक्त असलेल्या पदांची अधिकृत माहिती जाहीर केली असून, ३० मार्च २०२६ रोजी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) प्रतिमा वराळे यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या पोटनिवडणुकीत जिल्हयातील वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग या सर्व प्रमुख तालुक्यांमधील रिक्त जागांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.), अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गांतील जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे.
विशेष म्हणजे, केवळ सदस्यच नव्हे तर घोणसरी (कणकवली), विजयदुर्ग (देवगड), चाफेड (देवगड), चौके (मालवण), आणि सुकळवाड (मालवण) यांसारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच/थेट सरपंच पदासाठीही निवडणूक होणार असल्याने स्थानिक राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय रिक्त जागांचा धावता आढावा
तालुका प्रमुख रिक्त पदे / ग्रामपंचायती
- वैभववाडी : अरुळे, निमअरुळे, गडमठ, नावळे, सडुरे-शिराळे (सदस्य पदे)
- कणकवली : बोर्डवे, कळसुली, तळेरे, कलमठ, वारगाव आणि घोणसरी (सरपंच)
- देवगड : मणचे, आरे, पेंढरी, रामेश्वर आणि विजयदुर्ग, चाफेड (सरपंच)
- मालवण : आमडोस, देवली, सुकळवाड, चौके (सरपंच), पळसंब (सरपंच)
- कुडाळ : ओरोस बु., कसाल, चेंदवण, कालेली (थेट सरपंच), हलोक (थेट सरपंच)
- दोडामार्ग : फुकेरी, तळकट, सासोली, मणेरी, आयी, कोलझर, परमे
निवडणुकीचे मुख्य आकर्षण
- एकूण रिक्त जागा: १०० पेक्षा जास्त सदस्य आणि सरपंच पदे.
- थेट सरपंच पदे: कालेली, विजयदुर्ग, चाफेड, सुकळवाड यांसारख्या मोठ्या गावांत थेट सरपंच निवड.
- आरक्षण: महिला आणि मागास प्रवर्गासाठी मोठ्या प्रमाणावर जागा आरक्षित.
ग्रामीण भागात हालचाली वाढल्या
या नोटीशींमुळे आता ग्रामीण भागात हालचाली वाढल्या असून, इच्छुक उमेदवारांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रशासन आता पुढील निवडणूक कार्यक्रमाच्या तयारीत आहे.
Web Summary : Sindhudurg district announces by-elections for over 100 vacant Gram Panchayat member and Sarpanch positions across various talukas. Elections include seats for women, OBC, SC, and ST categories. Key villages like Vijaydurg will elect Sarpanchs, intensifying local politics. Preparations are underway in rural areas.
Web Summary : सिंधुदुर्ग जिले में 100 से अधिक ग्राम पंचायत सदस्य और सरपंच पदों के लिए उपचुनाव की घोषणा की गई है। चुनाव में महिलाओं, ओबीसी, एससी और एसटी श्रेणियों के लिए सीटें शामिल हैं। विजयदुर्ग जैसे प्रमुख गाँव सरपंचों का चुनाव करेंगे, जिससे स्थानीय राजनीति तेज होगी। ग्रामीण क्षेत्रों में तैयारियां चल रही हैं।