शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : आशा वर्कर्स युनियनच्यावतीने निदर्शने आंदोलन, प्रशासनाचे लक्ष वेधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 17:17 IST

आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय सेवेत कायम करा, अठरा हजार मासिक वेतन द्या, विविध पदांवर बढती द्या या मुख्य मागणीसह अन्य एकवीस मागण्यांकडे वारंवार शासनाचे लक्ष वेधूनही शासन त्याची दखल घेत नसल्याने सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने शेकडोंच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देआशा वर्कर्स युनियनच्यावतीने निदर्शने आंदोलन, प्रशासनाचे लक्ष वेधले  मागण्यांची दखल घेत नसल्याने नाराजी

सिंधुदुर्गनगरी : आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय सेवेत कायम करा, अठरा हजार मासिक वेतन द्या, विविध पदांवर बढती द्या या मुख्य मागणीसह अन्य एकवीस मागण्यांकडे वारंवार शासनाचे लक्ष वेधूनही शासन त्याची दखल घेत नसल्याने सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने शेकडोंच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले.सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या अध्यक्षा अर्चना धुरी व सचिव विजयाराणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी निलिमा लाड, सुभाष निकम, प्रियांका तावडे, नम्रता वळंजू यांच्यासह शेकडो आंदोलक उपस्थित होते.जिल्ह्यातील जनतेस सार्वजनिक आरोग्यसेवा देत त्यांचे आरोग्य जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहोत. परिणामी माता व बालमृत्यू प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. दवाखान्यातील प्रसुती ९९ टक्केपर्यंत होत असून नवजात शिशुंना १०० टक्के लसीकरण होत आहे. तसेच संसर्गजन्य आजार ओळखून त्यांचा फैलाव रोखण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. आमच्या कामाचे स्वरुप कठीण असून कामाचे ठिकाणही असुरक्षित आहे. वेळी-अवेळी, दिवस-रात्र काम करावे लागते.परिणामी तुटपुंज्या मोबदल्यावर काम करावे लागत आहे. तेलंगणा राज्यात किमान मानधन ६ हजार रुपये व अन्य भत्ते, केरळमध्ये ७ हजार ५०० रुपये मानधन व भत्ते मिळत आहेत. महाराष्ट्रात मात्र आशा व गटप्रवर्तक यांना कसलेही मानधन न देता नाममात्र मोबदला दिला जातो. त्यामुळे आपल्या विविध मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आशा वर्कर्स युनियनच्यावतीने अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

मात्र, शासनाने मागण्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन केले.चर्चेसाठी निमंत्रित करा, अन्यथा आंदोलन छेडूआशा व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांना शासनाने आमंत्रित करावे. तसे न केल्यास १८ जुलै रोजी नागपूर येथील अधिवेशनस्थळी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा या संघटनेने यावेळी दिला आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गChakka jamचक्काजामWomenमहिला