शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

सिंधुदुर्ग : नोटाबंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका : आनंदराव अडसूळ यांचा आरोप, देशात १५ लाखांहून अधिक कामगार बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:52 IST

नोटा बंदीनंतर जीएसटीमुळे आज देशात पंधरा लाखांहून अधिक कामगार बेरोजगार आहेत. या योजनेमुळे देशाचे भविष्य चांगले असले तरी सर्वच क्षेत्रात सध्या फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा निर्णय चांगला असला, तरी त्याची अंमलबजावणी योग्य झाली नसल्याचे मत राज्याचे माजी अर्थमंत्री तथा शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देनोटाबंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका : आनंदराव अडसूळ यांचा आरोपदेशात १५ लाखांहून अधिक कामगार बेरोजगारअडसूळ यांनी दिली ओरोस कृषीभवन येथे येथील आरपीडी हायस्कूलला भेट

सावंतवाडी : नोटा बंदीनंतर जीएसटीमुळे आज देशात पंधरा लाखांहून अधिक कामगार बेरोजगार आहेत. या योजनेमुळे देशाचे भविष्य चांगले असले तरी सर्वच क्षेत्रात सध्या फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा निर्णय चांगला असला, तरी त्याची अंमलबजावणी योग्य झाली नसल्याचे मत राज्याचे माजी अर्थमंत्री तथा शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांनी येथे व्यक्त केले.ओरोस कृषीभवन येथे कार्यक्रमानिमित्त आलेल्या खासदार अडसूळ यांनी येथील आरपीडी हायस्कूलला भेट दिली. यावेळी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संस्था अध्यक्ष विकास सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, वेंगुर्ले तालुकाप्रमुुख बाळा परब, शहरप्रमुख शब्बीर मणियार, दिनेश सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.अडसूळ पुढे म्हणाले, नोटा बंदीमुळे आज राज्यातील एकूण जिल्हा बँकेतील ३३ बँकातील ५ हजार ८०० कोटी रूपये अडकून पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शिवाय सरकारने कर्जमाफी केली. याचे पैसेही जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. मात्र, तेही पैसे नोटाबंदीमुळे सद्यस्थितीत अडकून पडले आहेत.

आपण पंतप्रधानांचे याबाबत लक्ष वेधले आहे. मात्र अद्यापही याबाबत काहीच हालचाल दिसून येत नाही. जीएसटीचा निर्णय हा जरी चांगला असला तरी घाईगडबडीत घेतलेला हा निर्णय आहे. त्याचा परिणाम सर्वत्र दिसून येत असून सर्वसामान्य व्यापाराला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान येणाऱ्या बॅजेटमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.नगराध्यक्षांनी घेतली सदिच्छा भेटखासदार अडसूळ हे सावंतवाडीत आल्याचे समजताच नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्यांची आरपीडी कॉलेजमध्ये जाऊन भेट घेत नगराध्यक्ष या नात्याने त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्याशी काही वेळ चर्चा केली.

टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळRatnagiriरत्नागिरी