शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: आंबोली-चौकुळ येथे काळ्या बिबट्याचे दर्शन

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 24, 2024 17:48 IST

आंबोली ( सिंधुदुर्ग ) : चौकुळ येथे जंगलमय भागामध्ये काळा बिबट्या काही पर्यटकांना दिसून आला. त्या पर्यटकांपैकी काही पर्यटकांनी ...

आंबोली (सिंधुदुर्ग) : चौकुळ येथे जंगलमय भागामध्ये काळा बिबट्या काही पर्यटकांना दिसून आला. त्या पर्यटकांपैकी काही पर्यटकांनी त्याचे छायाचित्रणही केले. त्यामुळे चौकुळ आणि आंबोलीची जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, परंतु या जैवविविधतेचे मोठे नुकसान होण्याची भीती ही व्यक्त होत आहे. त्यामुळे वनविभागाने  शिकारी आणि तस्कर असलेल्या लोकांवर करडी नजर ठेवणे गरजेचे असल्याचे मत निसर्गप्रेमींमधून मत व्यक्त होत आहे.काळा बिबट्या म्हणजेच ब्लॅक पँथर म्हणून ज्याला ओळखले जाते. हा अतिशय दुर्मीळ बिबट असून, बिबट्यामधील जनुकीय बदलामुळे कधी-कधी काळा बिबट्या जन्माला येतो. हा बिबटा काळा असतो. आंबोलीमध्ये जवळपास २६ प्रकारचे वन्यप्राणी दिसून येतात. त्यामध्ये हत्ती, वाघ, बिबटे, अस्वल असे अनेक प्राणी आढळून येतात. त्यात भर म्हणून या काळा बिबट्यामुळे आंबोलीच्या जैवविविधतेमध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे. यापूर्वी केवळ आंबोलीमध्ये काळा बिबट्या आहे, असे म्हटले जायचे, परंतु आता त्याचे प्रत्यक्ष छायाचित्र मिळाल्याने आंबोली चौकुळची जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गleopardबिबट्या