शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचारच्या जिल्हा प्रबंधकांना घेराव, साटेली-भेडशी ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 16:17 IST

दोडामार्ग तालुक्यात दूरसंचारची सुविधा काही महिने ठप्प असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी गुरुवारी साटेली-भेडशी येथील ग्राहक सेवा केंद्रात भारत संचार निगमचे जिल्हा प्रबंधक सुधाकर भिसे यांना घेराव घालून दूरसंचारच्या भोंगळ कारभाराबाबत जाब विचारला.

ठळक मुद्देदूरसंचारच्या जिल्हा प्रबंधकांना घेरावसाटेली-भेडशी ग्रामस्थ आक्रमक

दोडामार्ग : तालुक्यात दूरसंचारची सुविधा काही महिने ठप्प असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी गुरुवारी साटेली-भेडशी येथील ग्राहक सेवा केंद्रात भारत संचार निगमचे जिल्हा प्रबंधक सुधाकर भिसे यांना घेराव घालून दूरसंचारच्या भोंगळ कारभाराबाबत जाब विचारला.विविध समस्यांबाबत वेळोवेळी कल्पना देऊनही याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अखेर १५ दिवसांत सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन भिसे यांनी दिल्यानंतर तब्बल साडेतीन तासानंतर घेराव मागे घेण्यात आला.साटेली-भेडशी येथील ग्राहक सेवा केंद्र्रात दूरसंचार विभागाचे जिल्हा प्रबंधक भिसे यांची गुरुवारी नियोजित भेट होती. गेल्या काही महिन्यांपासून दूरसंचारची सेवा सुरळीत मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच ग्राहकांनी साटेली-भेडशी सेवा केंद्रात ठाण मांडले. मात्र, दुपारपर्यंत भिसे उपस्थित राहिले नसल्याने ग्राहक अधिकच संतप्त झाले.

दुपारच्या दरम्यान भिसे केंद्रात आल्यानंतर ग्राहकांनी त्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. यावेळी कावरेबाबरे झालेल्या भिसे यांनी आपण १० दिवसांपूर्वी येथील कार्यभार स्वीकारला आहे. मला या ठिकाणच्या समस्यांचा अभ्यास करू द्या, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनीही ग्राहकांशी संवाद साधला.मात्र, नागरिकांनी आक्रमक होत प्रत्येकवेळी नवीन अधिकारी हजेरी लावतो आणि वेळ मागतो. पण आमच्या समस्यांचे निराकरण कधीच होत नाही. गेल्या दहा दिवसांत दोन वेळा मनोरा बंद करण्यात आला होता. वीज वितरणचे बिल थकीत आहे. या परिसरात हजारो ग्राहक सेवा घेत आहेत. तरीदेखील कंपनीला बिल भरणे शक्य होत नाही हे दुर्दैव आहे, असे मत नागरिकांनी मांडल्यावर जिल्हा प्रबंधकही निरुत्तर झाले.समस्यांचे समाधान झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला. अखेर १५ दिवसांत दूरसंचारच्या सेवेबाबत असलेल्या सर्व समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन भिसे यांनी दिल्यानंतर घेराव मागे घेण्यात आला.यावेळी साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, सदस्य डांगी, कलय्या हिरेमठ, अल्ताफ शेख, संदेश वरक, प्रकाश पवार, सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो, गोपाळ गवस, सूर्यकांत धर्णे, प्रकाश मोर्ये, वायंंगणतड उपसरपंच प्रथमेशसावंत, गोविंद शिरसाट, भैय्या पांगम आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलsindhudurgसिंधुदुर्ग