शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

श्रुती बुजरबरूवा यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 17:52 IST

कणकवली येथील गंधर्व फाउंडेशनच्यावतीने ३२वी गंधर्व संगीत सभा आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित करण्यात आली होती. या संगीत सभेत पं. विजय कोपरकर यांच्या शिष्या व आसामच्या गायिका श्रुती बुजरबरूवा यांनी गायन सादर केले. त्यांच्या सुमधूर गाण्याने कणकवलीकर रसिक मंत्रमुग्ध झाले . यानिमित्ताने त्यांना एक सुखद अनुभव घेता आला.

ठळक मुद्देश्रुती बुजरबरूवा यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध !३३ वी संगीत सभा २२ सप्टेंबर रोजी!

सुधीर राणेकणकवली : येथील गंधर्व फाउंडेशनच्यावतीने ३२वी गंधर्व संगीत सभा आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित करण्यात आली होती. या संगीत सभेत पं. विजय कोपरकर यांच्या शिष्या व आसामच्या गायिका श्रुती बुजरबरूवा यांनी गायन सादर केले. त्यांच्या सुमधूर गाण्याने कणकवलीकर रसिक मंत्रमुग्ध झाले . यानिमित्ताने त्यांना एक सुखद अनुभव घेता आला.ही गंधर्व संगीत सभा भालचंद्र खानोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दामोदर खानोलकर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. गंधर्व फाऊंडेशन ही शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी दर महिन्याला मैफिलींचे आयोजन करणारी जिल्ह्यातील एक संस्था आहे. अनेक देश विदेशातील कलाकार या संगीत सभेत गाण्यास उत्सुक असतात. कणकवलीकर रसिकांची उपस्थिती व मिळणारी दाद ही या मैफिलीला अजून उंचीवर नेते. या महिन्यातील संगीत सभा आसामच्या गायिका श्रुती बुजरबरूवा यांच्या सुश्राव्य गायनाने पार पडली. त्यांना संवादीनी साथ वरद सोहोनी व तबला साथ हेरंब जोगळेकर यांनी केली.श्रुती यांनी प्रथम राग पुरिया कल्याण मधील 'आज सो बन ' ही विलंबीत एकताल व ' मन हरवा आयो रे ' ही द्रूत तीनतालातील रचना सादर केली. त्यानंतर हमीर रागामध्ये सुंदर बदन श्याम (मध्यलय झपताल), तेंदेरे कारन (दृत एकताल) व चंचल चपल ( अती दृत एकताल) या बंदिशी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं.उपस्थित कलाकारांचे स्वागत दामोदर खानोलकर यांनी केले. मध्यांतरामधे प्रसाद घाणेकर यांनी श्रुती यांची मुलाखत घेतली. आसाम ते पुणे या संगीताच्या प्रवासाबद्दल श्रुती यांनी सांगितले. बिहू हा आसामी गानप्रकार त्यांनी सादर केला. मूळच्या आसामच्या असूनही श्रुती यांनी अतिशय सुंदर मराठी भाषेत मुलाखत दिली. एस. एन. डी. टी. पुणे येथे एम.ए. पर्यंतचा प्रवास कसा झाला हे त्यांनी या संवादात सांगितले.मैफिलीच्या उत्तरार्धात पद्मविभूषण गिरिजादेवी यांचा एक दादरा श्रुती यांनी सादर केला. 'आज राधा ब्रीज को चली ' ही भैरवी गाऊन त्यानी या मैफिलीची सांगता केली. सिटी एन.सी.पी.ए. शिष्यवृती, श्रीमती विजया घाटे पुरस्कार २०१९ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित या गायिकेने सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले.ही संगीत सभा यशस्वीतेसाठी अभय खडपकर, सागर महाडिक, किशोर सोगम, संतोष सुतार, श्याम सावंत, दामोदर खानोलकर, मयूर कुलकर्णी, विलास खानोलकर, ध्वनिव्यवस्थापक राजेश गुरव, विजय घाटे, मनोज मेस्त्री यांनी मेहनत घेतली.३३ वी संगीत सभा २२ सप्टेंबर रोजी!गन्धर्व फाऊंडेशनच्यावतीने ३३ व्या गंधर्व संगीत सभेचे आयोजन २२ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. पं. अरविंद मुळगांवकर व पं. शुभांकर बॅनर्जी यांचे शिष्य तरूण लाला (मुंबई) हे एकल तबला वादन प्रस्तुत करणार आहेत. यावेळी रसिकांनी उपस्थीत राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. 

टॅग्स :musicसंगीतsindhudurgसिंधुदुर्ग