शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: सरमळेतील ऐतिहासिक मंदिर एका रात्रीत पूर्णत्वास, हर हर महादेवचा जयघोष 

By अनंत खं.जाधव | Updated: March 6, 2024 15:52 IST

पांडवकालीन इतिहासाची साक्ष देणारे श्री.सपतनाथ मंदिर एका रात्रीत पूर्ण

सावंतवाडी : हर हर महादेवाचा गजर ब्रह्म वृदांच्या मंत्रोच्चार आणि हजारो भाविकांची उपस्थितीत बांदा दाणोली मार्गावरील सरमळे येथील पांडवकालीन इतिहासाची साक्ष देणारे श्री.सपतनाथ मंदिर एका रात्रीत पूर्ण करण्यात आले. यासाठी  11 राजस्थानी कारागीर वीस ते पंचवीस स्थानिक मदतनीस चार जेसीबी याच्या साह्याने हे मंदिर पूर्णत्वास नेण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता.बांदा दाणोली मार्गावरील सरमळे येथील पांडवकालीन श्री.सपतनाथ मंदिर एका रात्रीत बांधण्याचा निश्चय गोव्यातील एका उद्योजकांकडून करण्यात आला होता. त्याने आपले मत सरमळे वासियाकडे बोलून दाखवले होते. सरमळे वासियानी हे काम मनावर घेतले आणि देवाच्या सर्व रूढी परंपरा पूर्ण करून हे मंदिर एका रात्रीत बांधण्याचे निश्चित केले. त्यासाठी काल मंगळवार 5 मार्चला सूर्यास्तानंतर काम सुरू करायचे आणि आज बुधवारी 6 मार्चला सूर्योदयापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे ही निश्चित करण्यात आले.त्याप्रमाणे मंगळवारी सायंकाळी उशिरा ब्रह्म वृदांच्या मंत्रोच्चारात आणि हजारो भाविकांच्या हर हर महादेवच्या जयघोषात करण्यात आला. मंदिराच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली. या मंदिराला पांडवकालीन इतिहास लाभल्याच्या हे मंदिर एका रात्रीत पूर्णत्वास नेण्याचे आवाहन होते. मात्र हे आवाहन श्री.सपतनाथ देवाच्या साक्षीने सर्वानी लीलया पूर्ण करण्याचे ठरवले होते. त्यानुसार काम सुरू करण्यात आले.या कामासाठी 11 राजस्थानी कारागीर दाखल झाले होते. त्याशिवाय स्थानिक मदतनीस असे 30 ते 35 जणांनी सूर्यास्तानंतर ब्रह्म वृदांच्या मंत्रोच्चारात आणि हजारो भाविकांच्या हर हर महादेवच्या जयघोषात कामाला सुरुवात केली. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी मंदिर साकारण्याचे सुवर्णक्षण यांची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.या धार्मिक सोहळ्यासाठी मंगळवारी सकाळी ग्रामदैवत सातेरी भगवतीची पालखी, तरंगे, निशाण काठी सवाद्य मिरवणुकीने चार दिवस या ठिकाणी वास्तव्यासाठी दाखल झाली आहेत. सपतनाथाचा इतिहास पांडवकालीन असल्यामुळे हे मंदिर एका रात्रीत साकारण्यासाठी क्षणाचीही विश्रांती न घेता हे मंदिर कारागीर आणि स्थानिक मदतनीस यांनी सूर्योदयापूर्वी पूर्णत्वास नेले. मंदिर परिसरात हजारो भाविक दाखल झाल्याने जत्रेचे स्वरूप आले होते. यावेळी माजी आमदार शिवराम दळवी, अर्चना घारे-परब यांच्यासह अनेक नेतेही ठाण मांडून होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी