शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

शिवसेनेत कामांची धमक नाही

By admin | Updated: January 29, 2016 23:59 IST

नारायण राणे यांचा पत्रकार परिषदेत टोला; चौपदरीकरण कार्यक्रमात सेनेची फजिती

रत्नागिरी : युतीच्या काळात मी मुख्यमंत्री असताना व नितीन गडकरी बांधकाम मंत्री असताना चौपदरीकरणाचा निर्णय घेतला होता. मात्र, आजच्या कार्यक्रमात शिवसेनेची खरी फजिती झाली. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये कोकणातील विकासकामे करून घेण्याची धमक नाही. त्यामुळे शिवसेना म्हणजे नुसतेच ट्रेलर आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला. चौपदरीकरणाच्या संदर्भात गेल्या वर्षभरापासून काँग्रेसतर्फे आम्ही आंदोलन करत होतो. यामध्ये किती जागा जाणार, त्याचा दर काय मिळणार व मोबदल्याचे पैसे कधी मिळणार याबाबत खुलासा होत नव्हता. जिल्हा प्रशासनाची ही जबाबदारी होती. मात्र, आज गडकरींनी चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाला आपल्याला बोलावले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आपण या कार्यक्रमात चौपदरीकरणाबाबत ज्या सूचना केल्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्या आहेत. तसेच जैतापूरपेक्षा जमिनीची अधिक किंमत चौपदरीकरण प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही मागणीही मान्य झाली असून, हेक्टरी ४० लाखापर्यंत मोबदला मिळणार आहे. या फॉर्म्युल्यानुसार काम होणार असल्याने कॉँग्रेसने आंदोलने मागे घेतली आहेत. मात्र, कुठेही भूसंपादनावेळी जबरदस्ती झाली तर कॉँग्रेस गप्प बसणार नाही.भिडे नामक व्यक्तीने मुंबई ऐवजी रायगडाच्या पायथ्याशी शिवरायांचे स्मारक करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामागे बोलविता धनी वेगळाच आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)1 फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिफायनरीचा प्रकल्प होणार असल्याची घोषणा केली. मात्र, प्रस्तावापलिकडे त्यात काहीही नाही. १५ हजार एकर म्हणजे काय हे यांनी पाहिलेय काय? त्यातील पाच हजार एकरमध्ये जंगल उभारणार असे ते सांगतात. आधी आहेत ती जंगले वाचवा. रिफायनरी प्रकल्प प्रदूषणकारी नाही, असे हे म्हणतात. परंतु, तज्ज्ञांकडून याबाबत खात्री करून घेणार आहे. जर प्रदूषणकारी प्रकल्प असेल तर तीव्र विरोध केला जाईल, असे राणे म्हणाले.2सेनेच्या आमदारांमध्ये दम नाही. हे सरकारमध्ये आहेत की नाही हे त्यांचे त्यांनाही माहीत नाही, अशी स्थिती आहे. सेनापक्षप्रमुख सरकारमधून बाहेर पडायची केवळ धमकी देतात. परंतु, ते सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत. भाजपही चिकट आहे. त्यामुळे सत्ता सोडणार नाही. 3स्मार्ट सिटीच्या यादीत मुंबईचा समावेश नाही. मोदी यांनी मुंबईवर सूड उगवण्याची एकही संधी सोडलेली नाही. मुंबईचे महत्व कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.