शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

सावंतवाडी खरेदी विक्री संघावर शिवसेनेचे वर्चस्व

By admin | Updated: June 6, 2015 00:24 IST

काँग्रेसचीही मुसंडी : १० जागा जिंकत वर्चस्व राखले

सावंतवाडी : सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सहकार वैभव पॅनेलने निर्विवादपणे वर्चस्व राखले असून, १५ जागांपैकी १० जागांवर मोठी आघाडी घेतली. तर काँग्रेसनेही ५ जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली आहे. संस्था गटातून तीन उमेदवारांना समान मते पडल्याने टाय झाली होती. मात्र, या निवडणुकीचा कौल काँग्रेसच्या बाजूने लागला असून काँग्रेसचे चंद्रकांत राऊळ हे विजयी झाले आहेत. तर विद्यमान चेअरमन गुरुनाथ पेडणेकर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेत थेट लढत होती. प्रथमच या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. काँग्रेसकडून विद्यमान चेअरमन गुरुनाथ पेडणेकर यांच्यासह प्रविण देसाई, शशिकांत गावडे, प्रमोद परब उभे राहिले होते. तर शिवसेनेकडून सखाराम ठाकूर, फ्रान्सिस डिसोजा, गणपत देसाई, अनारोजीन लोबो आदी उभे राहिले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती. शुक्रवारी सकाळपासून राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये निवडणुकीची प्रकिया सुरू झाली. ही प्रक्रिया सायंकाळपर्यंत पार पडली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यापासून मतदान केंद्रावरच निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी पहिल्यांदा संस्था गटाची मतमोजणी सुरू झाली. या संस्थागटातून प्रविण देसाई २३, शशिकांत गावडे २०, ज्ञानेश परब २२, प्रमोद परब २१ या चारही जागा काँग्रेसने आपल्याकडे राखल्या. तर शिवसेनेचे बाबल ठाकूर २० मते घेत निवडून आले आहेत. याच निवडणुकीत संस्था गटाचे उमेदवार शिवसेनेचे नारायण सावंत, काँग्रेस चे चंद्रकांत राऊळ व जॉकी डिसोझा यांना समान १९ मते पडल्याने ही जागा टाय झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी विनोद चौगुले यांनी या जागेच्या निकालासाठी चिठ्ठी उडवण्याचा निर्णय घेतला आणि यामध्ये चंद्रकांत राऊळ हे विजयी झाले. त्यामुळे संस्था गटातून ५ जागा जिंकत काँग्रेसने वर्चस्व राखले. तर उर्वरित जागांवर व्यक्तिगत मतदारसंघात शिवसेनेचे अरुण गावडे, संदीप केसरकर, भदू नाईक, मुकुंद राऊळ हे विजयी झाले आहेत. मागास वर्ग प्रतिनिधीत शिवसेनेचे दीपक जाधव हे १५ मतांनी निवडून आले आहेत. महिला प्रतिनिधींमध्ये शिवसेनेच्या अनारोजीन लोबो व मंजुषा गावडे यांनी अनुक्रमे २६७ मते घेत विजय कायम राखला आहे. भटक्या विमुक्त जातीमधून शिवसेनेचे दत्ताराम कोळमेकर हे विजयी झाले असून इतर मागास प्रतिनिधीमधूनही शिवसेनेचे महादेव सोनुर्लेकर यांनी विजय संपादन केला आहे. (प्रतिनिधी)