शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवचेतना रॅलीने शहर दुमदुमले

By admin | Updated: February 19, 2017 23:19 IST

स्वराज्य संघटनेच्यावतीने आयोजन : सावंतवाडीवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी : छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने आणि भगवेमय वातावरणाने शिवजयंतीनिमित्त सावंतवाडीतील स्वराज्य संघटनेने आयोजित केलेल्या शिवचेतना रॅलीने सावंतवाडी शहर दुमदुमून गेले. या रॅलीत अबालवृध्दांसह महिला भगिनींनीही सहभाग दर्शविला. घोड्यांसह ढोलताशांच्या गजरात येथील राजवाड्यातून या रॅलीची सुरूवात करण्यात आली. गवळीतिठा शिवाजी चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. सावंतवाडीतील स्वराज्य संघटनेच्यावतीने यावर्षीही शिवप्रेमी व नागरिकांच्या पुढाकाराने शिवजयंतीनिमित्त शिवचेतना रॅलीचे आयोजन केले होते. रविवारी सकाळी १० वाजता राजवाड्यातून या रॅलीला शुभारंभ करण्यात आला. युवराज लखम खेमसावंत भोसले यांच्या हस्ते शिवचेतना रॅलीची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर खासकीलवाडा शाळा नं. ४ नजीक शिवपुतळ्याला युवराज लखम खेमसावंत भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅली पुढे मार्गस्थ झाली. कॉटेल हॉस्पिटलमागील शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला तेथून जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानासमोरून हॉटेल मँगो २, सालईवाडा, मुख्य बाजारपेठ, गांधी चौक याठिकाणी रॅली पोहोचली. यावेळी गांधी चौकातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला. सुरूवातीपासून उत्साह निर्माण झालेल्या रॅलीतील तरूणांनी शिवाजी महाराजांचा जयघोष सुरू केला. ‘जय शिवाजी, जय भवानी, बघतोस काय मुजरा कर’ आदी घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला. भगवे फेटे, घोड्यांसह ढोलपथक व कौशल्य गवस या बालकाने साकारलेले बालशिवाजी हे या रॅलीतील आकर्षण ठरले. रॅली ज्या मार्गाने जात होती, त्या मार्गावर रांगोळी घातली होती. रॅलीत उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, स्वराज्य संघटनेचे सोमनाथ गावडे, राजू कासकर, श्रीपाद सावंत, सुनील पेडणेकर, सीताराम गावडे, राजू शेटकर, दिलीप भालेकर, प्रशांत मोरजकर, संजू शिरोडकर, सचिन मोरजकर, अमोल साटेलकर, अतुल केसरकर, प्रमोद तावडे, संदीप धुरी, अंकित तेंडुलकर, आनंद रासम यांच्यासह शिवप्रेमी सहभागी झाले होते. या चेतना रॅलीची सांगता गवळी तिठा येथे भगवा ध्वज उभारून करण्यात आली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शिवचेतना रॅलीला शुभेच्छा दिल्या. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. (वार्ताहर)