शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

शिवरायांचा पुतळा पंचधातुचा नाही; राजकोट किल्ल्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार, वैभव नाईकांचा गंभीर आरोप 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 27, 2024 19:31 IST

महाविकास आघाडी व जनतेच्यावतीने उद्या तहसिल कार्यालयावर मोर्चा 

कणकवली : मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामात भ्रष्टाचार झाला आहे. पालकमंत्र्यांनी बगलबच्छा कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी या एवढ्या मोठ्या कामाची ६ मजुर संस्थांना २५ - २५ लाखांची कामे दिली. त्याच धर्तीवर आपटे नामक ठेकेदाराला अनुभव नसताना काम दिले. उभारण्यात आलेला छत्रपतींचा पुतळा हा पंचधातूचा नाही. हे कोसळल्यामुळे काल सिध्द झाले आहे. कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे या घटनेची जबाबदारी स्वीकारुन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली. कणकवली येथील विजय भवन येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत नौदल विभागाची तक्रार करण्यात आली आहे. जे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकाच रजिस्टरला नोंदवण्यात आले आहे. पुतळा पडणार याची कल्पना  बांधकाम विभागाला आल्याने त्यांनी पत्र दिले होते. घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. राणे कुटुंबियांची तोंडे कुणी बांधली ?राज्याच्या विविध प्रश्नांवर तोंड काढून बोलणारे राणे कुटुंबिय या विषयावर गप्प आहेत, आता त्यांची तोंडे कुणी बांधली आहेत का? असा सवाल वैभव नाईक यांनी केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. उद्या आक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी महाविकास आघाडी व जनतेच्यावतीने उद्या, बुधावारी (दि २८) तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणार येणार. मालवण भरड नाका येथून हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चात जनता सहभागी होईल असेही नाईक यांनी सांगितले. मंत्री केसरकरांचे वक्तव्य अशोभनीय मंत्री दीपक केसरकर यांनी केलेलं वक्तव्य अशोभनीय आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. अश्या घटनांमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यास भिक घालणार नाही. या दूर्घटनेला बांधकाम खातेच जबाबदार आहे,त्यामुळे आम्ही ते कार्यालय फोडले असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजVaibhav Naikवैभव नाईक