शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सेवेत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन, शिवसेनेचा इशारा

By सुधीर राणे | Updated: September 7, 2022 12:59 IST

कणकवली: कणकवली उपजिल्हा रुग्णालयात चार डायलेसीस मशीन असूनही केवळ तीनच वापरल्या जातात. रुग्णांना औषधे बाहेरून लिहून दिली जातात. स्वच्छतेबाबतही ...

कणकवली: कणकवली उपजिल्हा रुग्णालयात चार डायलेसीस मशीन असूनही केवळ तीनच वापरल्या जातात. रुग्णांना औषधे बाहेरून लिहून दिली जातात. स्वच्छतेबाबतही तीच स्थिती आहे. उपलब्ध डॉक्टरांनी बाह्य रुग्ण विभागासह अत्यावश्यक सेवा दिली पाहिजे. याबाबत सुधारणा करून रुग्णांना चांगली सेवा द्या. आठवडाभरात सेवेत सुधारणा न दिसल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व महिला आघाडी जिल्हाप्रमुख मधुरा पालव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिष्टमंडळाने दिला.कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सेवा सुविधांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत डॉ. चौगुले यांच्याशी चर्चा केली. यावेळी राजू राठोड, कलमठ उपसरपंच वेदेही गुडेकर, संजना कोलते, दिव्या साळगावकर, रोहिणी पिळणकर, संजना साटम, तेजस राणे, विलास गुडेकर आदी उपस्थित होते.उपजिल्हा रुग्णालयात चार डायलेसीस मशीन आहेत. मात्र तीनच चालू आहेत. सोमवारी डायलेसीस होत नाही. त्यामुळे रुग्णांना त्रास होत असल्याकडे या शिष्टमंडळाने लक्ष वेधले. यावेळी चौथी मशीन इर्मजन्सी काही समस्या आल्यास ठेवलेली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तीही चालू करा, लोकांना सेवा द्या, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, या समस्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर आहेत. काही तज्ज्ञही आहेत. तर काही ऑन कॉल आहेत. मात्र, ओपीडी कमी झालेली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता , ऑक्सिजन प्लांट उभारूनही अद्याप सुरू न झाल्याकडेही लक्ष वेधून चर्चा करण्यात आली. आठवडाभरात रुग्णालयांच्या सुविधांमध्ये, रुग्णसेवेत फरक न झाल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी शिवसेनेकडून देण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेनाhospitalहॉस्पिटल