शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गद्दारांच्या माध्यमातून 'तो' कपटी डाव पुन्हा पूर्णत्वास आणण्याचे दिल्लीकरांचे षडयंत्र, विनायक राऊतांचा आरोप

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 8, 2022 13:19 IST

'ईडी' सरकारने लोकाभिमुख सर्व कामांना स्थगिती दिली

मालवण (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्रातील सत्ता संघार्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी करावी अशी देशवासीयांची इच्छा आहे. घटनात्मक जो पेच निर्माण झाला आहे. तो सर्वोच्च न्यायालयातूनच सुटू शकतो त्याला दिशा मिळू शकते. लोकशाहीच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय आहे. त्या दृष्टीने शिवसेनेच्या वतीने जे ज्येष्ठ विधिज्ज्ञ आहेत ते सर्वोच्च न्यायालयात मजबूत व खंबीरपणे बाजू मांडत असल्याचे मत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले.शिवसेनेची बाजू ही सत्याची आहे. आज पूर्णपणे राष्ट्रीय कार्यकारिणीचे ९५ टक्के सदस्य हे शिवसेनेबरोबर, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ४० आमदार आणि काही मोजके कार्यकारिणीचे सदस्य सोडले तर शिवसेनेच्या अस्तित्वाला कोणताही धोका नाही नसल्याचे राऊत यांनी सांगितले. गणेशोत्सवानिमित्त तळगाव या आपल्या गावी आलेल्या खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेनेची जी बाजू आहे ती सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आली आहे. शिवाय ती निवडणूक आयोगाकडेही मांडण्यात आलेली आहे. दुर्दैवाने त्यावरील निर्णय लवकर होत नाही आहे. तो लवकरच होईल अशी आशा आहे.'तो' कपटी डाव होता गद्दारांच्या माध्यमातून पूर्णत्वास आणण्याचे षडयंत्रअमित शहा मुंबईत येऊन बोलले त्यावरून त्यांच्या जे पोटात होते ते ओठातून बाहेर आले. दुर्दैवाने त्यावेळच्या मोरारजी देसाईंना मुंबई केंद्रशासित करायची होती. ती महाराष्ट्राच्या जनतेने होऊ दिली नाही. यात अनेकांनी आपले बलिदान दिले आणि मुंबई मिळविली आहे. दुर्दैवाने आजही त्याचपद्धतीने मोरारजी देसाई यांचा जो कपटी डाव होता तो शिवसेनेतील गद्दारांच्या माध्यमातून पुन्हा पूर्णत्वास आणण्याचे षडयंत्र हे दिल्लीकरांनी राबविलेले आहे.म्हणूनच शिवसेनेची निशाणी गोठवायची, शिवसेनेच्या नावावर हक्क सांगायचा, कागदपत्रांवर हक्क सांगायचा एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही हक्क सांगायचा अशा पद्धतीने नीच वृत्ती गद्दार लोकांच्या माध्यमातून राज्यात राज्यकर्ते साकार करताहेत.महाविकास आघाडी अभेद्यराज्यातील महाविकास आघाडी अभेद्य आहे. शिवसेना संकटात असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे भविष्यात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्याठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तेथे महाविकास आघाडीची युती करायची की नाही हा स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा आहे. विधानसभा आणि लोकसभेला युती करायची की नाही हे त्यावेळेला ठरविले जाईल. सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचा आमदार निवडून येणार हे सत्य आहे हे दिसून येईल. इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीत घटक पक्षांशी चर्चा करून रणनीती ठरविली जाईल.'ईडी' सरकारने लोकाभिमुख सर्व कामांना स्थगिती दिलीराज्यातील सध्याचे जे ईडी (एकनाथ-देवेंद्र) सरकार आले आहे. दुर्दैवाने या महाराष्ट्रातील अल्पसंख्याक, मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जातीचा घटक असेल या सगळ्या घटकांसाठी उद्धव ठाकरे सरकारने जी निधीची तरतूद केली होती. अण्णासाहेब महामंडळाचे पूर्वीचे बजेट ३०० कोटीचे होते ते १ हजार कोटी केले आणि माटेकर समाजाला न्याय देण्याचे काम केले. दुर्दैवाने या ईडी सरकारने १ एप्रिल २०२१ पासूनचे लोकाभिमुख जी कामे सुचविली होती त्या सर्व कामांना स्थगिती दिली. विविध घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अनुदानासह अन्य कामांना स्थगिती देण्यात आली आहे. एकीकडे कामांना स्थगिती देत दुसरीकडे भंपक घोषणा केल्या जात आहेत. त्यांना काळजी आहे ती मुंबई-सुरत बुलेट ट्रेनची, त्यांना काळजी आहे मोठ- मोठ्या रस्त्यांची, मोठ्या प्रकल्पांची जेणेकरून सगळीकडून ओरबडता येईल.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे