शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चार घरांची चव चाखून आलेले शिवसेनेला शहाणपणा शिकवायला निघालेत, विनायक राऊतांचा केसरकरांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 15:13 IST

मागच्या वेळी उद्धव ठाकरेंची सभा झाली नसती तर केसरकरांचं विसर्जन त्याच वेळी झालं असतं, विनायक राऊतांनी साधला निशाणा.

सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात राजकीय नाट्य रंगलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केलं. यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही सुरू आहेत. यातच शिवसैनिकांना बळ देण्यासाठी अन् पक्षाला उभारी देण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा सुरु केली आहे. दरम्यान, सोमवारी कोकणात होत असलेल्या या निष्ठा यात्रेत त्यांनी कुडाळमध्ये बंडखोर आमदारावर जोरदार टीका केली. तसंच निवडणुकीला सामोरे जाण्याचा आव्हान केलं. यानंतर त्यांची यात्रा बंडखोर आमदार दीपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघात आली.

या सभेदरम्यान खासदार विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांवर टीकेचा बाण सोडला. "उद्धव ठाकरेंची सभा मागच्या वेळी झाली नसती तर केसरकरांचं विसर्जन त्याच वेळी झालं असतं. शिवसेनेत आले त्यांनी आधार दिला. त्यांना मदत केली म्हणून उद्धव ठाकरेंनी वैभव नाईक, राजन साळवींसारखा कार्यकर्ता असतानाही केसरकरांना मंत्रिपद दिलं, लाड पुरवले. परंतु या पवित्र भूमीत असे गद्दार निर्माण झाले हे दुर्देव आहे," असं म्हणत राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

"चार घरांची चव चाखून आलेले शिवसेनेला शहाणपणा शिकवायला निघालेत. हिंदुत्वावर आता हे पोपट बोलायला लागले. ज्या सावंतवाडीकरांनी बोट पकडून राजकारणात आणलं त्या दिलीप नार्वेकरांना फेकून दिलं. शरद पवारांनी त्यांना आधार दिला त्यांच्या तोंडालाही केसरकरांनी पानं पुसली. ज्या शरद पवारांवर आरोप केले त्यांच्याबद्दल शब्द तोंडातून निघतात कसे?," असा सवालही त्यांनी केला. "ज्या पद्धतीनं तुम्हाला उभं केलं, मंत्रिपदासाठी शिंदे गटात गेला, परंतु आईवडिलांची शपथ घेऊन सांगा, तुम्ही गद्दारी केली तुम्हाला शिवसेनेचं नाव घेण्याचा अधिकार नाही," असंही ते म्हणाले. आम्हाला संजय राऊतांचा अभिमान असून शिवसेनेचा नेता असावा तो संजय राऊतांसारखाच असं वक्तव्यही त्यांनी केलं.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Vinayak Rautविनायक राऊत Shiv Senaशिवसेना