शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

'पांढऱ्या कपडयावर कोट चढवला म्हणून नेता होत नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 19:38 IST

सावंतवाडी: पांढऱ्या कपडयावर कोट चढवला म्हणजे कोण नेता होत नाही, वाडोस ग्रामपंचायतची निवडणूक लढवून पहिले निवडून या आणि नंतर ...

सावंतवाडी: पांढऱ्या कपडयावर कोट चढवला म्हणजे कोण नेता होत नाही, वाडोस ग्रामपंचायतची निवडणूक लढवून पहिले निवडून या आणि नंतर शिवसेना नेत्यांवर बोला. देणेकरी येणार म्हणून घराच्या अंगणात कुत्रे बांधता हे सर्वाना माहीतीय, बोलायला लागलो तर पळता भुई थोडी होईल असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार याच्यासह पदाधिकाऱ्यांनी विशाल परब यांना दिला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी बोलताना कासार म्हणाले, विशाल परब यांची खासदार राऊतावर बोलण्यातही उंची नाही. ते सावंतवाडीत राहून काय धंदे करतात हे बाहेर काढल्यास  त्यांना पळताभुई थोडी होईल. आरोंदा रेडी, सावंतवाडी, माणगाव येथील जमिनीचे व्यवहार लक्षात घेता काय काय उपद्व्याप आहेत समजून घ्यावेत. स्वतःच्या बंगल्यात राहताना बाहेर कुत्रे सोडून राहावे लागते ही वस्तुस्थिती आहे मग हे कुत्रे कशासाठी बांधता देणेकरी येणार म्हणून का अशीच आम्हाला शंका येते असे ते म्हणाले. नेता व्हायच असेल तर आधी स्वतःच्या गावची निवडणूक लढवून दाखवावी. वाडोस येथून ग्रामपंचायतमध्ये निवडून या आणि नंतर आमच्या नेत्यांवर टिका करा असा सल्ला ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.दादागिरी आणि गुंडगिरी करणे हे शिवसैनिकांचे काम नाही ते विशाल परब यांनाच जमते. त्यामुळे खासदारांवर, विकासकामावर टिका करण्याआधी शासकिय मेडिकल कॉलेजला मिळालेली मंजूरी कोणी थांबविली हे आधी त्यांनी आपल्या नेत्यांना विचारावे असेही कासार म्हणाले. आणि आता यापुढे जर अशीच टिका झाली तर परब यांना घरातून बाहेर पडणे अवघड करू असा इशारा यावेळीही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.या पत्रकार परिषदेस उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, इन्सूली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, ओवळिये सरपंच अबजू सावंत, योगेश नाईक, वेत्ये येथील गुणाजी गावडे नाना पेडणेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण