शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बालेकिल्ल्यातच शिवसेनेला पराभवाचा धक्का

By admin | Updated: October 19, 2014 23:00 IST

निष्क्रीयतेला जनता कंटाळली : साठे

शिवाजी गोरे - दापोली विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. याच बालेकिल्ल्यातून शिवसेनेच्या तिकिटावर सूर्यकांत दळवी यांनी सलग पाचवेळा विजय संपादन केला होता. यावेळी षटकार मारुन मंत्रिपद मिळवण्याची अभिलाषा ते बाळगून होते. मात्र, एकेकाळचे कडवट शिवसैनिक, नवखे उमेदवार संजय कदम यांनी त्यांच्या षटकाराला ब्रेक लावला. सूर्यकांत दळवी यांचा मतदारसंघाशी तुटलेला संपर्क, कामाबाबत केलेली टंगळमंगळ आणि दुसरीकडे संजय कदम यांनी मतदारसंघाशी जोडलेले नाते, यामुळे दळवी यांना पराभव पत्करावा लागला.दापोली - मंडणगड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शशिकांत धाडवेंची मते निर्णायक ठरली. गेल्या वेळी दळवी याना ४८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी ते नक्की षटकार मारतील, असा तर्क केला जात होता. परंतु यावेळी शिवसेना - भाजप युती तुटल्याने भाजपतर्फे निवडणुकीच्या रिंगणात तरुण उमेदवार केदार साठे यांनी चुरस निर्माण केली होती. शिवसेनेवर टीकेची झोड उठवताना निष्क्रियविरुद्ध आमचा लढा आहे. दापोलीत ‘अब की बार सत्ता परिवर्तन’ हा नारा त्यांनी दिला होता. दापोलीतील एक गट शिवसेनेवर नाराज होता. पालगड जिल्हा परिषद गटाचे सदस्य राजेंद्र फणसे, केळशी गटाचे सदस्य, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, माजी तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे हे दळवी यांच्यावर नाराज होते. त्यांच्या नाराजीचाही फायदा राष्ट्रवादीला झाला. काँग्रेस पक्षातील पारंपरिक मतदारांनी काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादीच्या संजय कदम यांच्या पाठीशी ठाम राहिल्याने अटीतटीच्या लढतीत संजय कदम यांनी बाजी मारली. कुणबी फॅक्टर कोणाच्या पथ्यावर पडतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. कदम यांनी गेली २ वर्षे तालुक्यात विकासकामांचा धडाका लावला होता. त्याच जोरावर पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र, काल परवा आलेले संजय कदम यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले देसाई स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणातच होते. मात्र, त्यांना १० हजारांचा आकडासुद्धा पार करता आला नाही.दापोली विधानसभा मतदारसंघात कुणबी फॅक्टर निर्णायक ठरला असून, कुणबी फॅक्टरमुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन झाल्याने दळवी यांचा पराभव निश्चित मानला जात होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे या पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षात घेतल्याने सच्चा शिवसैनिक दुरावला गेला होता. निवडणुकीच्या धामधुमीत अनेक पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्याची स्पर्धाच जणू काही लागली होती. कुणबी फॅक्टरला खूश करण्यासाठी दापोली तालुका शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुखांची पदावरुन गच्छंती करुन त्यांना अपमानकारकरित्या हटवण्यात आले होते. रामदास कदम समर्थक शशी चव्हाण यांना जिल्हाप्रमुख पदावरुन अचानकपणे कमी करण्यात आले होते. त्याचबरोबर दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजेंद्र फणसे यांना विश्वासात न घेता त्यांच्या जागी संदीप राजपुरे यांची विधानसभा क्षेत्राध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे फणसे नाराज होते. शशी चव्हाण यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केल्याने भरसभेत शिवसैनिकांची माफी मागून त्यांना अपमानित करण्यात आले होते. त्यामुळे फणसे दुखावले गेले होते.दापोली विधानसभा मतदारसंघात एकहाती सत्ता असताना शिवसेनेकडून एकामागून एक काही चुका होत गेल्या. यातून खरा शिवसैनिक दुखावला गेला. शिवसेनेचे माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे यांना विश्वासात न घेता एका रात्रीत नाट्यमयरित्या समाजकल्याण सभापती पदावरुन पायउतार करण्याचे कटकारस्थान शिवसेनेत शिजले गेले. कट्टर शिवसैनिक भगवान घाडगे निवडणूक प्रचारापासून अलिप्त राहिले. राजेंद्र फणसे यांनी मुंबईत राहाणे पसंत केले. निवडणुकीच्या काळात पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे सेनेत गटबाजी उघड झाली होती.विशेष म्हणजे, सूर्यकांत दळवी यांचे दापोली मतदारसंघात विशेष काम दिसून येत नव्हते. इतकी वर्षे आमदारकी झाल्यानंतरही दळवी यांनी कामाचा विशेष प्रभाव दाखवला, असेही म्हणता येणार नाही. त्यामुळेच किशोर देसाई यांनी बंडखोरी करून आणि काँग्रेसशी घरोबा नसतानाही राष्ट्रवादीचे नवखे आणि बिगरदापोली उमेदवार संजय कदम यांनी मतदारसंघावर कब्जा मिळवला.दुसरीकडे संजय कदम यांनी स्वत:ला सुरूवातीपासूनच आमदारकीच्या स्पर्धेत ठेवून दापोलीच्या जनतेने विकासकामाला प्राधान्य दिले असून, कदमच्या रुपाने दापोली विधानसभेला नवीन नेतृत्त्वाची संधी मिळाली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेवर निर्विवाद वर्चस्व मिळवण्यासाठी कदम यांनी पराकाष्टा केली. दिवस - रात्र या मतदारसंघातील गावागावात विकासाच्या रुपाने पोहोचले. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून कदम यांनी केलेल्या कामाला जनतेने पसंती दिली.दापोली विधानसभा मतदारंसघाच्या पुनर्रचनेत खेड तालुक्याचा काही भाग जोडला गेला. मात्र, गेल्या पाच वर्षांत आमदार म्हणून खेडच्या जनतेचा विश्वास संपादन करण्यात दळवी अपयशी ठरले. मंडणगडचे पंचायत समिती सदस्य आदेश केणे यांना काँग्रेसमधून शिवसेनेत घेतल्यामुळे मंडणगड शिवसेनेत नाराजीचा सूर होता. सेनेतील काही शिवसैनिक केणे यांच्यामुळे नाराज होते. मंडणगड तालुक्यातील सेनेचे काही कार्यकर्तेे बहुजन विकास आघाडीचा उघडपणे प्रचार करत होते. दापोलीतसुद्धा तीच परिस्थिती होती. नाराज गटांना जवळ करण्यात दापोली सेनेला यश आले नाही.येथील कुणबी समाजाचे नेते सेनेच्या विरोधात गेले होते. त्यामुळे त्यांची भूमिका निर्णायक ठरली. शिवसेनेच्या कार्याध्यक्षांनी दापोलीत विराट सभा घेतल्यामुळे दापोलीत शिवसेनेचा विजयी षटकार बसेल, असे बोलले जात होते. मात्र, दळवी यांना स्वकियांबरोबरच अपक्षांची डोकेदुखी भोवली.खासदार अनंत गीते, रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारंघात फारसा प्रचार केला नाही. कुणबी समाजाला सेनेकडे वळवण्यात गीते यांना अपयश आले. कुणबी समाजाच्या मतांवर दापोली विधानसभा जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना यावेळी मात्र मतदारांनी धक्का दिला. दापोली मतदारसंघात एवढ्या सहजपणे दळवी यांचा पराभव होणे हे धक्कादायक मानले जात आहे. २५ वर्षांच्या दळवी यांच्या एकहाती सत्तेला सुरूंग लावण्यात कदम यांनी यश मिळवले आहे.गोड बोलून विकास होत नाही : कदमकेवळ गोड बोलून विकास होत नाही तर त्याला कृतीची जोड असावी लागते. गोड बोलून मतदारांना आपलेसे करायचे दिवस आता गेले आहेत. त्यामुळे दापोलीकर जनतेला विकास हवा आहे आणि तो करण्यासाठी मतदारांनी आमदार बदलला आहे. आमदारांच्या निष्क्रीय कारभाराला कंटाळल्याने जनतेने परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे आणि जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करेन. याठिकाणी पर्यटनवाढीच्या दृष्टीने काम करण्यासारखे खूप आहे. भविष्यात प्रत्येक दापोलीकराला अभिमान वाटेल, असे काम मी नक्कीच करून दाखवेन, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार संजय कदम यांनी दिली.निष्क्रीयतेला जनता कंटाळली : साठेआमचा लढा हा निष्क्रीय आमदारांविरोधात होता. आता आमदार बदलला आहेत. त्यामुळे हा लढाही संपला आहे. या आमदारांना हरवणे आवश्यक होते. गेल्या २५ वर्षांत त्यांनी विकासकामेच केलेली नाहीत. त्यामुळे दापोलीकरांचे मूलभूत प्रश्न आजही तसेच आहेत. याविरूध्द मतदारांनी एकत्र येणे गरजेचे होते. हा करिष्मा आता घडला आहे. आता दापोलीचा कायापालट आम्ही करू, जरी मी या निवडणुकीत पराभूत झालो असलो तरीही दापोलीच्या विकासासाठी मी नक्की काम करेन. राज्यात भाजपची सत्ता आली आहे. केंद्रातही भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे निधीची अडचण भासणार नाही. सत्तेचा वापर करून आम्ही सारेजण दापोलीच्या विकासासाठी एकत्र येऊ. आमदार कोण झाला, याच्याशी आमचे देणेघेणे नाही. फक्त आम्हाला निष्क्रीय आमदार नको होते, अशा शब्दात भाजपचे उमेदवार केदार साठे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर टीकेची झोड उठवली.