शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचा ठराव घेतल्यास गप्प बसणार नाही, शिवसेना नगरसेवकांचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 21:49 IST

सावंतवाडी नगर परिषदेच्या इंदिरा गांधी संकुलातील गाळेधारकांच्या प्रीमियम व भाडेवाढी सभागृहात चर्चा झाली. कोणताही ठराव झाला नाही मात्र चुकीचा ठराव घेतल्यास आम्ही गप्प राहणार नाही, असा आरोप शिवसेना नगरपरिषद गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी केला.

ठळक मुद्दे चुकीचा ठराव घेतल्यास गप्प बसणार नाही, शिवसेना नगरसेवकांचा खुलासा नगरपालिका बैठकीत फक्त चर्चा

सावंतवाडी : सावंतवाडी नगर परिषदेच्या इंदिरा गांधी संकुलातील गाळेधारकांच्या प्रीमियम व भाडेवाढी सभागृहात चर्चा झाली. कोणताही ठराव झाला नाही मात्र चुकीचा ठराव घेतल्यास आम्ही गप्प राहणार नाही. नगरपरिषद सभागृहात चर्चा झाली मात्र कोणताही ठराव झालेला नाही पण काहि जण चर्चेचा गैरअर्थ लावून जनतेची दिशाभूल करू पाहात आहेत. असा आरोप शिवसेना नगरपरिषद गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी केला.त्या शुक्रवारी नगरपालिका मासिक बैठकीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी डॉ. जयेंद्र परुळेकर, नगरसेवक खेमराज कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, दीपाली सावंत, माधुरी वाडकर, अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते.लोबो म्हणाल्या, सावंतवाडी नगरपरिषदेच्या बैठकीमध्ये इंदिरा गांधी संकुलातील गाळेधारकांचे प्रीमियम व भाडे वाढीबाबत कोणताही ठराव झालेला नाही. नगरपरिषदेमध्ये सत्ताधारी नगरसेवक आरडाओरड करत होते.

त्यामुळे चुकीचा संदेश बाहेर गेला. सावंतवाडी नगरपरिषद आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार देवू शकत नाही असे नगराध्यक्षांनी असे बोलणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्यासारखे आहे.

आमच्या काळामध्ये घरपट्टी, पाणीपट्टीमध्येच नगरपरिषद चालवत होतो. आता पैसे नाही कसे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित करून नगराध्यक्षांना विजयी करण्यासाठी खासदार, आमदार आले त्यांनी विकास निधी द्यावा असा सल्लाही लोबो यांनी दिला. आमदार नीतेश राणे यांनी वारंवार सांगितले होते तुम्ही नगराध्यक्ष द्या आम्ही विकास देतो तो कोठे आहे ? असा प्रश्न डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला.सार्वभौमत्व म्हणजे हुकुमशाही नाही : परूळेकरयावेळी डॉ. परुळेकर म्हणाले, नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत असे म्हणणाऱ्या नगराध्यक्षांनी २२ कंत्राटी कर्मचारी कसे काय नेमले ? त्याबाबत बोलावे शासनाकडून कर्मचाऱ्यांना पगार होतो, मात्र कंत्राटदार कर्मचारी कसे काय नेमतो ?असा सवालही त्यांनी केला. आपण प्रीमियम व भाडेवाढ अहवाल बोगस असल्याचे बैठकीत सांगितले आहे.

नियमास धरून अहवाल नाही. सार्वभौमत्व म्हणजे हुकूमशाही नाही. असे देखील परुळेकर यांनी सांगून जुन्या दाराने भाडेवाढ घेतली पाहिजे. प्रीमियम बाबत निर्णय घेता येणार नाही. सावंतवाडी नगरपरिषदेने प्रीमियम बाबत शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्याबाबत शासनाने कोणतेही उत्तर दिले नाही. त्या उत्तरासाठी प्रयत्न प्रथम करावा लागेल आणि नंतर प्रिमियम दिले जाईल असे ते म्हणाले. 

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीShiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग