शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आगामी लोकसभेसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग संपर्कप्रमुखपदी केली 'यांची' नियुक्ती

By सुधीर राणे | Updated: March 2, 2023 16:51 IST

शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

कणकवली: शिवसेना पालघर लोकसभा व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ संपर्कप्रमुखपदी आमदार रविंद्र फाटक यांची निवड करण्यात आली. शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फाटक यांची नियुक्ती केली. दरम्यान, कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो अभेद्य ठेवण्यासाठी पुढील काळात काम केले जाईल. सत्तेच्या माध्यमातून कोकणात सर्वांगीण विकास साधला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत अशी संघटना उभारण्यात येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांनी व्यक्त केली.आमदार फाटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असून कोकणात त्यांचा चांगला लोकसंपर्क आहे. अनेक वर्ष शिवसेना पक्षात काम करीत असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगले नेटवर्क उभे केले आहे. त्याचा उपयोग करून आगामी काळात शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी पक्षाच्यावतीने त्यांच्यावर संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या निवडीमुळे दोन्ही जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.रवींद्र फाटक यांनी २००९ मध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी किरकोळ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा चांगला संपर्क असल्याने आगामी काळात शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी मदत होणार आहे. आमदार फाटक यांची  संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर  शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संदेश सावंत -पटेल, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर, सरपंच संघटना दोडामार्ग प्रमुख प्रवीण गवस यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना