शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्य ज्युदो स्पर्धा, राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्गातील खेळाडू चमकले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 17:08 IST

राज्य ज्युदो स्पर्धा, राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत जिल्ह्याची वेगळी छाप उमटविली. कणकवली तालुक्यातील कासार्डे हायस्कूलचा खेळाडू सोनू राजू जाधव व सावंतवाडीची खेळाडू संजना आंबाड या दोन्ही खेळाडूंनी कांस्यपदकांनी जिल्ह्याचे खाते उघडले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनच्यावतीने १६ ज्युदो खेळाडूंनी विविध वजनगटात भाग घेतला आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरीय ज्युदो स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे गोंदियात उद्घाटनसोनू जाधव, संजना आंबाड कांस्यपदकाचे मानकरीसमाजाचे रक्षण करण्यासाठी मुलींनी पुढे आले पाहिजे  : दिलीप पाटील-भुजबळ

तळेरे , 2 : राज्य ज्युदो स्पर्धा, राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेसाठी राज्यभरातील २५ जिल्ह्यातून  ५५० पेक्षा अधिक खेळाडूंनी हजेरी लावली आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ ज्युदो खेळाडूंनी विविध वजनगटात सहभाग घेतला असून सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो असोसिएशनच्यावतीने खेळताना या सर्वच खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत जिल्ह्याची वेगळी छाप उमटविली. आपआपल्या वजनगटातून खेळताना कणकवली तालुक्यातील कासार्डे हायस्कूलचा खेळाडू सोनू राजू जाधव व सावंतवाडीची खेळाडू संजना आंबाड या दोन्ही खेळाडूंनी कांस्यपदकांनी जिल्ह्याचे खाते उघडले आहे. 

ज्युदो हा क्रीडा प्रकार मूळ भारतीय आहे. येथून तो चीन, जपान व त्यानंतर अमेरिकेत गेला आणि अमेरिकेतून परत भारतात आला. असा या खेळाचा प्रवास आहे. हा खेळ मुळात भारतीय असल्याचा प्रत्येकाने अभिमान बाळगून या खेळाचा नावलौकीक वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी केले. 

जिल्हा क्रीडा संकुलातील ‘इनडोअर स्टेडियम’ येथे अमॅच्युअर ज्युदो असोसिएशन गोंदिया व महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ४५ व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर मुले-मुलींच्या ज्युदो स्पर्धेचे उदघाटन डॉ. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे सचिव दत्ता आफळे, उपाध्यक्ष राजकुमार पुंडकर, सहसचिव डॉ. गणेश शेटकर, कोषाध्यक्ष रवी मेटकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मनोहर बनगे, अ‍ॅड. सुधीर कोंडे, नरिसंग यादव, पुरूषोत्तम चौधरी, जिल्हा अमॅच्युअर असोसिएशनचे अध्यक्ष अजितसिंह गौर, संयोजक अपूर्व अग्रवाल, सचिव राजेश गायधने उपस्थित होते. 

डॉ. भुजबळ पुढे म्हणाले की, पोलीस प्रशिक्षणात ज्युदो क्रीडा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्मसंरक्षणासाठी ज्युदोची भूमिका महत्त्वाची आहे. गोंदिया जिल्हा हा आदिवासीबहुल, दुर्गम व नक्षलग्रस्त असूनसुध्दा या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. या स्पर्धेच्या आयोजनामुळे गोंदियाचा नावलौकीक वाढण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाचे रक्षण करण्यासाठी मुलींनी ज्युदोचे चांगले प्रशिक्षण घेऊन दुर्गेच्या अवतारातून पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले.

राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धेत सहभागी असल्याचे प्रमाणपत्र असल्यास खेळाडूला नोकर भरती प्रक्रियेत ५ टक्के खेळाडू आरक्षणाचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

आफळे म्हणाले की, ज्युदो खेळामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. ज्युदोच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आज गरज आहे. महाराष्ट्राच्या मातीत खेळावर प्रेम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत. राज्याची खेळाची परंपरा ही उज्ज्वल आहे. या खेळाच्या वाढीसाठी समाजातील अनेक घटक आज पुढे येत आहेत, ही आनंदाची बाब आहे. ज्यांनी या खेळात खेळाडू म्हणून सुरुवात केली ते पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय पंचांपर्यंत पोहोचतील, असे त्यांनी सांगितले. 

अपूर्व अग्रवाल म्हणाले, या स्पर्धेच्या निमित्ताने आतापर्यंत सर्वात जास्त ज्युदो खेळाडू गोंदिया येथील स्पर्धेत सहभागी झाले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान गोंदिया जिल्ह्याला मिळाला आहे. या स्पर्धेत जे खेळाडू यशस्वी होतील ते देशपातळीवर राज्याचा नावलौकीक करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ज्युदो खेळासाठी योगदान देणारे पुणे येथील अ‍ॅड. सुधीर कोंडे यांचा शाल, श्रीफळ देऊन डॉ. भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध जिल्ह्यातून आलेले स्पर्धक मुले-मुली, पंच व मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चारशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग या स्पर्धेत असून सन २०१७-१८ ची राष्ट्रीय निवड चाचणीसुध्दा या स्पर्धेतूनच होणार आहे.