शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

नवा कालभैरव देवस्थानचा आजपासून शिमगोत्सव

By admin | Updated: March 11, 2017 22:16 IST

रंगपंचमीचा उत्सव रंगणार

अडरे : चिपळूण शहराचे सुप्रसिध्द देवस्थान ग्रामदैवत श्री देव नवा कालभैरव देवस्थान, चिपळूणतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिमगा महोत्सव दि. १२ ते १९ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. रविवार, दि. १२ रोजी रात्री १.३० वाजता पालखी श्रींचे मंदिरातून होमावरुन गौतमेश्वर गल्लीतील दोन्ही बाजूच्या आरत्या घेऊन मारुती चौकापर्यंत येईल. सोमवार, दि. १३ रोजी सकाळी ४.३० वाजता प्रभात रोडवरील डाव्या बाजूच्या आरत्या घेत चिंगळे यांच्या आवारात बसेल. तेथून श्री दत्त मंदिर, खेर्डी येथे बसेल. नंतर दयाघन अपार्टमेंटकडून रावतळे येथील आरत्या घेऊन श्री देवी विंध्यवासिनी भेटीला श्रींची स्वारी जाईल. दिवसभरात वडार कॉलनीपर्यंतच्या आरत्या घेऊन मंगळवारी पहाटे श्रींचे सहाणेवर बसणार आहे. मंगळवार, दि. १४ रोजी सकाळी ७ वाजता निघून होमावरुन शिवाजी चौक चिंचनाका येथे मनोहर हॉटेल पासून भोगाळेमार्गे मध्यवर्ती एस्. टी. बसस्थानकाकडून वीरेश्वर कॉलनीतील आरत्या घेऊन शेवटी शिवनदी पुलावरुन चिंचनाक्यातून आरत्या घेऊन वडनाकामार्गे बुधवारी सकाळी श्रींचे सहाणेवर जाणार आहे. दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता श्रींचे मंदिरातून निघून होमावरुन श्री वेस मारुती मंदिरामागून रामतीर्थमार्गे शंकरवाडी, भोईवाडा करुन श्री साई मंदिरात बसेल. त्यानंतर पप्पू कदम यांच्या घरासमोरुन दोन्ही बाजूच्या आरत्या घेऊन श्री देवी भवानी मंदिरात बसेल. त्यानंतर सायंकाळपर्यंत श्रीराम चौक, शेट्येआळीपर्यंतच्या आरत्या घेऊन गुरुवारी सकाळी सहाणेवर येईल. शनिवार, दि. १८ रोजी सकाळी ५ वाजता श्रींच्या मंदिरातून निघून होमाला प्रदक्षिणा घालून रामतीर्थ रोडमार्गे पवार यांची आरती घेऊन पाटील ते डांगे घरापर्यंत दोन्ही बाजूच्या आरत्या घेऊन राहुल गार्डन आवारात बसेल. परतीच्या प्रवासात देव लक्ष्मीनारायणमार्गे चितळे व कुलकर्णी यांच्या आवारात बसतील. त्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत सहाणेवर बसणार आहेत. (वार्ताहर)रंगपंचमीचा उत्सव रंगणारदि. १६ रोजी पालखी श्रींचे सहाणेवरुन निघून गुहागर रोडने आरत्या घेत मारवाडी आळीतून, शिवनदी पुलावरुन गुरवआळी, वडनाक्यापर्यंतच्या आरत्या घेत शुक्रवारी दुपारपर्यंत श्रींचे सहाणेवर येणार आहे. नंतर श्री देव कालभैरव लळिताचा कार्यक्रम होईल. त्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार, दि. १७ रोजी रंगपंचमी आहे. यादिवशी संपूर्ण चिपळूण शहरात रंगपंचमी खेळण्यात येणार आहे.दि.१२ रोजी रात्री १.३० वाजता आरत्या घेऊन मारुती चौकापर्यंत येईल.सोमवारीही विविधर् िठकाणी पालख्यांचा रंगणार भक्तभेटीचा सोहळा.शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत सहाणेवर बसणार आहे. शिमगोत्सवाची होणार शनिवारी सांगता.