शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोयती डोक्यात मारल्याप्रकरणी सात आरोपी दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 15:51 IST

जातीवाचक शिवीगाळ करीत लोखंडी कोयती डोक्यात मारीत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील कुसबे मधलीवाडी येथील सात आरोपींना जिल्हा वर्ग १ व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी दोषी ठरविले आहे. यात आरोपींची शिक्षा ११ फेब्रुवारी रोजी सुनावली जाणार आहे.

ठळक मुद्देकोयती डोक्यात मारल्याप्रकरणी सात आरोपी दोषीकुडाळ तालुक्यातील घटना : दाखल होता गुन्हा

सिंधुदुर्गनगरी : जातीवाचक शिवीगाळ करीत लोखंडी कोयती डोक्यात मारीत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील कुसबे मधलीवाडी येथील सात आरोपींना जिल्हा वर्ग १ व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी दोषी ठरविले आहे. यात आरोपींची शिक्षा ११ फेब्रुवारी रोजी सुनावली जाणार आहे.कुसबे मधलीवाडी येथील नामदेव नारायण घाडीगांवकर व तक्रारदार कुसबे बौद्धवाडी येथील अशोक तुकाराम जाधव यांच्यात पोखरण कुसबे येथील सर्व्हे नंबर ५२/४ च्या जमीन मालकीवरून वाद होता. हा वाद ३० ते ३५ वर्षे सुरू होता. याबाबत प्रांताधिकारी यांच्या न्यायालयात दावा दाखल झाल्याने तो न्यायप्रविष्ट होता.

१० नोव्हेंबर २०१५ रोजी तक्रारदार अशोक हे आपला मुलगा अजय यांच्यासह भातशेतीच्या पाहणीसाठी गेले होते. यावेळी आरोपी भातकापणी करीत होते. यावेळी अशोक व साक्षीदार अजय हे तेथून जात असताना आरोपी नामदेव घाडीगांवकर (६०), सखाराम पांडुरंग घाडीगांववर (४९), अरुण तुकाराम घाडीगांवकर (४५), मोहन सीताराम घाडीगांवकर (४५), अनिता अरुण घाडीगांवकर (४०), अस्मिता सखाराम घाडीगांवकर (३८), मयुरी मोहन घाडीगांवकर (३५) यांनी अडवून बेकायदा जमाव करीत अशोक व अजय यांना चिव्याच्या दांड्याने मारहाण केली.आरोपी मोहन घाडीगांवकर यांनी आपल्या हातातील कोयती अशोक यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर दुखापत केली. नामदेव घाडीगांवकर यांनी अशोक यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच इतर आरोपींनीही त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.

याबाबत अशोक जाधव यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सातही आरोपींविरोधात भादवि कलम अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९च्या कायद्यानुसार तसेच इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. ११ नोव्हेंबर २०१५ रोजी सर्वांना अटक करण्यात आले होते. सहाय्यक सरकारी अभियोक्ता रूपेश देसाई यांनी सरकारी पक्षाच्यावतीने काम पाहिलेनिकाल ११ फेब्रुवारीला दिला जाणारया प्रकरणी न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. यात तक्रारदार अशोक, साक्षीदार अजय, डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण यांनी तपासिक अधिकारी म्हणून काम पाहिले होते. यात सर्व सातही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. याचा निकाल ११ फेब्रुवारी रोजी दिला जाणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालयsindhudurgसिंधुदुर्ग