शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
4
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
5
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
6
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
7
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
8
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
9
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
10
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
11
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
12
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
13
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
14
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
15
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
16
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
17
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
18
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
19
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
20
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते

झारीतील शुक्राचार्यांचा बंदोबस्त करू : ठाकरे

By admin | Updated: October 9, 2014 00:18 IST

जमिनी लाटणाऱ्यांना सोडणार नाही

वेंगुर्ले : विकासाला ‘खो’ घालणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांच्या बंदोबस्तासाठी शिवसेना समर्थ आहे. आम्ही प्रकल्पासाठी कोणाच्याही जमिनी लाटू देणार नाही आणि जमिनी लाटणाऱ्यांना सोडणारही नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे नाव न घेता दिला. विजयाचे तोरण बांद्यातून बांधण्यास सुरुवात करण्याचे आवाहनही त्यांनी केले.शिवसेना उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ आज, बुधवारी येथील साई मंगल कार्यालयात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, माजी आमदार शंकर कांबळी, उद्योजक पुष्कराज कोले, महिला आघाडीप्रमुख स्नेहा तेंडुलकर, सहसंपर्कप्रमुख शैलेश परब, अनारोजीन लोबो, सुकन्या नरसुले आदी उपस्थित होते. वेंगुर्ले येथे ५० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले आहे; मात्र काही झारीतील शुक्राचार्यांनी ते होऊ दिले नाही. या झारीतील शुक्राचार्यांचा बंदोबस्त करायला शिवसेना समर्थ आहे. या रुग्णालयाचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणार आणि त्याला द्वारकानाथ कोटणीसांचे नाव देणार असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना विकासाचे व्हिजन घेऊन जनतेसमोर आली आहे. येथील मच्छिमारांसह अनेक लोकांचे प्रलंबित प्रश्न आहेत. कोणी कुठल्याही पक्षातून लढला तरी हरकत नाही. माझा दागिना तुमच्या हातात दिला आहे, त्याचे काय करायचे ते तुम्हीच ठरवा, असे सांगत चांगल्या माणसांची साथ नेहमी लागते. दीपक केसरकर त्यातीलच एक असल्याचेही ठाकरे यांनी सांगत त्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)महाराष्ट्राचे तुकडे नाहीतएकीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी शिवसेनेच्या विरोधात लढत आहेत, तर दुसरीकडे पंचवीस वर्षांचा मित्र म्हणवून घेणारा भाजपही आमच्या विरोधात लढत आहे. या दोघांना आपली वेगवेगळी स्वप्ने साकार करायची आहेत. पण शिवसैनिक हा शिवाजी महाराजांचा मावळा आहे. तो कधीही गप्प बसणार नाही आणि महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. असे उद्धव ठाकरे म्हणाले.पार्सल अबुधाबीला पाठवामाजी आमदार दीपक केसरकर यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे पार्सल मुंबईला पाठवूया, असे म्हटले होते. तोच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते पार्सल मुंबईला न पाठवता अबुधाबीला पाठवा. समुद्रामार्गे तिकडे दादा लोक जातात, असे सांगताच सभागृहात हास्याचे फवारे पसरले.