शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत परप्रांतीय विरूद्ध स्थानिक संघर्षांवर तोडगा

By अनंत खं.जाधव | Updated: December 8, 2023 13:22 IST

सावंतवाडी : सावंतवाडीत सध्या कर्नाटकातील परप्रांतीय मुकादम बांधकाम व्यवसायासाठी स्वतःचीच वाहने वापरत असल्याने स्थानिक टेम्पो चालक-मालक यांचा धंदा होत ...

सावंतवाडी : सावंतवाडीत सध्या कर्नाटकातील परप्रांतीय मुकादम बांधकाम व्यवसायासाठी स्वतःचीच वाहने वापरत असल्याने स्थानिक टेम्पो चालक-मालक यांचा धंदा होत नाही. त्यामुळे परप्रांतीय मुकादमांनी स्वतःची वाहने बंद ठेवावी आणि पूर्वी सारखा स्थानिकांना धंदा द्यावा यावरून गेले आठवडाभर स्थानिक विरूद्ध परप्रांतीय असा संघर्ष  सुरू होता. यावर गुरूवारी रात्री उशिरा तोडगा एकमताने तोडगा काढण्यात आला. यात उद्योजक शैलेश पई यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली.यावेळी परप्रांतीय मुकादम यांनी वाहतूक व्यवसायात उतरणार नसल्याचे स्पष्ट केल्याने वादावादी शिवाय तोडगा निघाला. ही बैठक येथील आदिनारायण मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी स्थानिक टेम्पो चालक-मालक यांच्यासह परप्रांतीय मुकादम उपस्थित होते.बैठकीत परप्रांतीयांवर अन्याय नको म्हणून पहिले भाडे स्थानिकांना देवून त्यांनी आपल्या कामासाठी गाडी वापरण्यास हरकत नाही, असा निर्णय घेण्यात आला. आमच्या सारखे टेम्पो चालक- मालक सुध्दा व्यावसायिक आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. असे परप्रांतीय मुकादम यांनी स्पष्ट केले.

भविष्यात त्यांच्याकडून सहकार्य न झाल्यास आम्ही त्यांना सहकार्य करणार नाही. त्यामुळे एकमताने झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूने तोडगा काढण्यात आला. मुकादमांचे नुकसान नको. म्हणून त्यांनी आपल्या कामासाठी गाडी वापरण्यास मुभाही यावेळी देण्यात आली आहे. मात्र पहिले भाडे हे स्थानिकालाच द्यावे,अशी अटही स्थानिकांमधून घालण्यात आली.यावेळी संघटनेचे पदाधिकारी घोगळे म्हणाले, दोन्ही बाजूने चर्चा करुन वाद मिटविण्यात आला आहे. परप्रांतीय मुकादमांनी आपण माघार घेतली आहे. ट्रान्सपोर्टच्या गाड्या चालविणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. तरीही काही प्रमाणात त्यांना त्यांच्या वैयक्तीक कामासाठी सुट देण्यात येणार आहे. त्यातील काही मुकादमांनी आपण सहकार्य करू, असे मान्य केले आहे. त्यामुळे आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना पाठींबा आहे.परंतू कोणी या ठिकाणी नियम मोडत असेल तर त्याला आम्ही आमच्या पध्दतीने जाब विचारू, तसेच विरोधी मुकादमांकडून आमच्या स्थानिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या, त्या त्यांनी तात्काळ मागे घ्याव्यात. अशा सुचनाही त्यांना करण्यात आल्या आहेत. यावेळी उद्योजक शैलेश पई, बिल्डर नीरज देसाई, सुहास सातोसकर, दादा खोर्जुवेकर, देवेंद्र टेमकर, बावतीस फर्नांडिस, बेटा नार्वेकर आदि उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी