शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

जेष्ठ कवी, गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे हृदयविकाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 11:17 IST

culture Sindhudurg : जेष्ठ कवी आणि ख्यातनाम गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे रविवारी (ता.११) पहाटे तळेरे येथे हद्यविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. नवव्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते. ह्यचांदणे नदीपात्रातह्ण या त्यांच्या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

ठळक मुद्देजेष्ठ कवी, गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे हृदयविकाराने निधन साहित्य क्षेत्रावर शोककळा : अखिल भारतीय गझल संमेलनाचे भूषविले होते अध्यक्षपद

वैभववाडी : जेष्ठ कवी आणि ख्यातनाम गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे रविवारी (ता.११) पहाटे तळेरे येथे हद्यविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. नवव्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते. ह्यचांदणे नदीपात्रातह्ण या त्यांच्या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.वैभववाडी तालुक्यातील नानिवडेचे सुपुत्र असलेले मधुसूदन नानिवडेवर हे सध्या तळेरे येथे वास्तव्यास होते. पहाटे त्यांना राहत्या घरी हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांचे पार्थिव नानिवडे येथे नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर अत्यंविधी करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रातील अनेक लोक उपस्थित होते.नानिवडेकर गेली अनेक वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी शेकडो कविता लिहील्या. त्यांच्या कित्येक गझला लोकप्रिय आहेत. २००४ मध्ये त्यांचा चांदणे नदीपात्रात हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहाला सन्मानाचे अनेक पुरस्कार मिळाले. एक प्रतिभावंत कवी म्हणून त्यांची राज्यभर ओळख होती. त्याचबरोबर गझलकार म्हणूनही त्यांनी एक वेगळी प्रतिमा साहित्य क्षेत्रात निर्माण केली होती.

गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या अनेक गझला गायिल्या आहेत. त्यांची निघायला हरकत नाही ही गझल खुपच गाजली. गझल प्रांतात त्यांना प्रसिध्द गझलकर सुरेश भट यांचे वारसदार म्हणून ओळखले जात असे.कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वाटचालीत त्यांचे भरीव योगदान आहे. परिषदेच्या तालुकानिहाय शाखा निर्माण करण्यात त्यांचा सिहांचा वाटा होता. त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात गझलांचे शेकडो कार्यक्रम केले. गेली तीस वर्षे ते पत्रकारितेत कार्यरत होते. पुढारीमध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून काम केले.

याशिवाय राज्यातील विविध दैनिकांत स्तंभ लेखन, तसेच आघाडीच्या मासिकांतून लेखन केले. सध्या ते महाराष्ट्र टाईम्समध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. नानिवडेचे सरपंच म्हणूनही पाच वर्षे त्यांनी कारभार पाहिला होता. त्यांच्या निधनाची माहिती राज्यभर पसरताच साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.दिलखुलास व्यक्तिमत्व!वैभववाडीतील ख्यातनाम कवी चेतन बोडेकर यांच्या गाव या मालवणी काव्यसंग्रहासाठी नानिवडेकर यांनी प्रस्तावना द्यावी अशी विनंती करण्यात आली. परंतु मालवणी कविता संग्रहाला प्रस्तावना देण्याचा अधिकार हा वस्त्रहरणकार लेखक गंगाराम गवाणकर अर्थात नानांचा आहे, असे सांगत त्यांनी त्यांच्याशी संपर्कही साधला. गावसाठी त्यांच्याकडून प्रस्तावना लिहून घेत प्रकाशनही त्यांच्याच हस्ते होण्यासाठी पुढाकार घेतला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकsindhudurgसिंधुदुर्ग