शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘नाणार’विरोधात सेनेची संघर्ष यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:55 IST

राजापूर : स्थानिकांचा विरोध असतानादेखील केंद्र्र व राज्य शासनाने रिफायनरी प्रकल्प लादण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली डोंगर तिठा ते चौके यादरम्यान काढण्यात आलेल्या ‘चलेजाव संघर्ष यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.मुसळधार पाऊस कोसळत असतानादेखील त्याची पर्वा न करता मोर्चा पार पडला. केंद्र्र ...

राजापूर : स्थानिकांचा विरोध असतानादेखील केंद्र्र व राज्य शासनाने रिफायनरी प्रकल्प लादण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली डोंगर तिठा ते चौके यादरम्यान काढण्यात आलेल्या ‘चलेजाव संघर्ष यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.मुसळधार पाऊस कोसळत असतानादेखील त्याची पर्वा न करता मोर्चा पार पडला. केंद्र्र व राज्य शासनाच्या विरोधात बुलंद घोषणांनी प्रकल्प परिसर दणाणून गेला. मोर्चा समाप्त होताच खासदार विनायक राऊत यांच्यासह सेनेच्या नेत्यांनी केंद्र्र व राज्य शासनाविरोधात टीकेची झोड उठविताना हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी शासनाला ठणकावले.नाणार परिसरातील १४ गावांतील जनतेचा १०० टक्के विरोध असतानादेखील विद्यमान केंद्र्र व राज्य सरकारने नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्प लादला असून, शिवसेनेने त्याविरोधात मागील काही महिन्यांत जोरदार विरोध केला आहे. शासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली रिफायनरी प्रकल्पासह सौदी अरेबियाची अरांम्को व आबुधाबीच्या अ‍ॅडनॉक कंपनीला चले जाव करण्यासाठी संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.रविवारी सकाळी डोंगर तिठा ते चौके अशी सुमारे चार कि.मी. पायी यात्रा काढण्यात आली. या यात्रेत खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र्र महाडिक, सेनेचे उपनेते आमदार उदय सामंत, संघर्ष समितीचे सचिव भाई सामंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेनेचे मुंबईतील पदाधिकारीही सहभागी झाले होते. स्थानिक प्रकल्पग्रस्तांचाही मोठा सहभाग होता.डोंगर तिठा ते चौके असा प्रवास झाल्यावर चौके येथे त्या यात्रेचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी केंद्र्र व राज्य शासनाचा चांगलाच समाचार घेण्यात आला. एकीकडे मुख्यमंत्री हा प्रकल्प लादणार नाही, जनतेशी चर्चा करू, असे सांगतात; पण ते नाणारला येऊन येथील जनतेला का भेटत नाहीत, असा खडा सवाल खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला.कोकणात बळजबरीने लादलेला हा रिफायनरी प्रकल्प जोवर शासन रद्द करणार नाही, तोवर आमचा लढा असाच चालू राहील, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला. स्थानिक संघर्ष समितीच्यावतीने त्यांचे नेते भाई सामंत यांनीही रिफायनरीवरून शासनाचा समाचार घेतला.पुढील टप्प्यात गावापासून रत्नागिरीपर्यंत यात्राजनतेचा विरोध डावलून प्रकल्प लादल्यामुळे शिवसेनेने शासनाविरोधात सुरू केलेली पहिली ‘चलेजाव संघर्ष यात्रा’ डोंगर तिठा ते चौके अशी पार पडली. पुढील टप्प्यात ती प्रकल्पग्रस्त गावांमधून रत्नागिरी अशी काढली जाणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्यावतीने देण्यात आली.राजपुत्र नको, भूमिपुत्र हवेतआम्हाला राजपुत्र नको, तर भूमिपुत्र हवे आहेत, अशा शब्दांत त्यांनी शासनाला फटकारले, तर सिडकोच्या जमीन विक्री व्यवहारप्रकरणी शासनाने जसे चौकशीचे आदेश दिले, तशाच प्रकारे नाणारमधील परप्रांतीयांकडून झालेल्या सर्व जमिनींच्या खरेदीच्या व्यवहारांचीही चौकशी हे राज्य शासन का करीत नाही? असा खडा सवाल शिवसेना उपनेते व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी उपस्थित केला.